
Viral Video: Pakistani MP Slams PM Shehbaz Sharif : भारत आणि पाकिस्तानमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. आतापर्यंत पाकचा एकही हल्ला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी यशस्वी होऊ दिलेला नाही. पाकिस्तानी लष्कर बँकफूटवर जात असताना देशाचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही जोरदार टीका होऊ लागली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केला. त्यामध्ये पाकमधील 9 दहशतवादी कॅम्प उध्वस्त करण्यात आले. अजूनही हे ऑपरेशन सुरूच असून पाकमध्ये घुसून भारताकडून हल्ले केले जात आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पाक लष्कराचीही काही खैर नाही, असे तेथील लोकच बोलू लागले आहेत.
याबाबतचा पाकच्या संसदेतील एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. भाजपच्या सोशल मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. पाकिस्तानी खासदार शाहित खट्टर यांचा हा व्हिडीओ असून त्यामध्ये ते पाक सरकार आणि शहबाज शरीफ यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत.
‘खट्टर हे संसदेत शरीफ यांना डरपोक म्हणताना दिसत आहे. तसेच आपले पंतप्रधान एवढे डरपोक आहेत की मोदींचे नावही घेऊ शकत नाही. एखाद्या देशाचा नेताच डरपोक असेल तर सेना कधीच लढाई करू शकत नाही,’ असे खट्टर यांनी म्हटले आहे. भर संसदेत तेथील खासदारानेच पाकच्या पंतप्रधानांची अब्रु वेशीवर टांगल्याने तेथील आक्रोश चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान, मालवीय यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले आहे की, पाकिस्तानचे खासदारच त्यांच्या पंतप्रधानांना डरपोक म्हणत आहेत. तसेच ते मोदींचे नाव घ्यायलाही घाबरतात, हेही स्वीकारत आहेत. हे सर्वकाही सांगून जाते. त्यांच्या सेनेचे मनोबल खचले असून सरकार दिशाहीन बनले आहे. भारताची निर्णायक भूमिका यांना त्रासदायक ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.