
India-US Trade Relations : ऑपरेशन सिंदूरवरून आधीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांमुळे राजकीय वादळ उठले आहे. त्यातच त्यांनी सलग दोन दिवस भारताविषयी मोठी विधाने करत डिवचले आहे. तसेच त्यांनी 25 टक्के आयात शुल्क लादत भारताला मोठा झटकाही दिला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला ते मृत अर्थव्यवस्था म्हणालेत. त्यावरून भारतातील राजकारण तापले आहे. आता मोदी सरकारकडून याबाबत लोकसभेत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल लोकसभेत गुरूवारी याबाबत माहिती दिली. आयात शुल्काबाबतच्या घडामोडींवर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. देशातील उद्योगांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता दिली जात आहे. दोन्ही देशांमध्ये चार द्विपक्षीय बैठका झाल्या आहेत. कराराला अंतिम करण्यासाठी महत्वाच्या बैठका झाल्या आहेत.
आयात मालावर 10 ते 15 टक्के टेरिफवर चर्चा झाली होती, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही ट्रम्प यांनी 25 टक्के टेरिफ लावल्याने भारतला झटका बसला आहे. याअनुषंगाने गोयल यांनी स्पष्ट केले की, द्विपक्षीय व्यापार कराराबाबत बोलणे झाले होते. अनेक व्हर्च्यूअल बैठकही झाल्या होत्या. आम्ही आपल्या देशांतर्गत उद्योगांची सुरक्षा करू. देशहितासाठी आवश्यक ती पावले उचलू.
जगाच्या विकासात भारताचे योगदान 16 टक्के आहे. आपण जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहोत. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयाकडे अग्रेसर आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. अमेरिकेच्या टेरिफच्या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांचे आकलन केले जात आहे, असेही गोयल यांनी सांगितले.
दरम्यान, अमेरिकेने 25 टक्के टेरिफचा निर्णय घेतला असला तरी भारताकडून त्याला तातडीने प्रत्युत्तर दिले जाणार नाही. याबाबत चर्चेतून मार्ग काढण्याचे धोरण भारताकडून अवलंबले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे सरकारवर कसलाही दबाव नसला तरी केवळ चर्चा आणि योग्य रणनीतीच्या माध्यमातून यातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. चीनने अमेरिकेच्या टेरिफ बॉम्बला जशास तसे प्रत्युतर दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.