India Vs Pakistan : 'तो' ऐतिहासिक फोटो हटवल्यानंतर काँग्रेसनं राजकारण तापवलं; आता लष्कराकडून 'हा' मोठा खुलासा

Priyanka Gandhi On India Pakistan War Photo : भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 मध्ये झालेल्या युध्दात अखेर पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करली होती. त्यावेळी शरणागतीच्या कागदपत्रांवर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सही करतानाचा फोटो ऐतिहासिक ठरला होता. या फोटोवरून नवा वाद पेटला आहे.
India Vs Pakistan
India Vs PakistanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi: लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे.या अधिवेशनात सत्ताधारी मोदी सरकार आणि विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत रोज विविध मुद्द्यांवरुन घमासान सुरू आहे. यातच काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केलेल्या आरोपामुळे मोदी सरकार घेरण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला होता. तसेच सरकारकडून याबाबत कोणताच खुलासा न आल्यानं सत्ताधारी एनडीए काहीशी बॅकफूटला गेली होती. पण आता लष्कराकडून या विरोधकांच्या आरोपांवर मोठा खुलासा करण्यात आला आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 मध्ये झालेल्या युध्दात अखेर पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करली होती. त्यावेळी शरणागतीच्या कागदपत्रांवर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सही करतानाचा फोटो ऐतिहासिक ठरला होता. या फोटोवरून नवा वाद पेटला आहे.

दिल्लीमधील लष्करप्रमुखांच्या कार्यालयात शरणागतीच्या कागदपत्रांवर पाकिस्तानी अधिकारी सही करतानाचा ऐतिहासिक फोटो अनेक वर्षांपासून लावण्यात आला होता. पण तो फोटो हटवून त्या ठिकाणी दुसरा फोटो लावण्यात आल्यावरून काँग्रेस (Congress) खासदार प्रियांका गांधी यांनी सोमवारी (ता.16) लोकसभेत नाराजी व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत होती.

India Vs Pakistan
Vidhan Parishad Sabhapati Maharashtra Election: विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी भाजपचा चेहरा ठरला; 'या' नावावर शिक्कामोर्तब

आता लष्करप्रमुखांच्या विश्रामगृहात पाकिस्तानी लष्कराच्या आत्मसमर्पणाच्या चित्राबाबत लष्कराकडून खुलासा आला आहे. लष्कराने आपल्या X हँडलवर म्हटले आहे की, 1971 च्या युद्धाचा फोटो काढला गेला नाही. अधिकाधिक लोकांना ते पाहता यावे यासाठी ते मुद्दाम दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.

खरं तर, 1971 मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या आत्मसमर्पणाचे चित्रण करणारे पेंटिंग लष्करप्रमुखांच्या विश्रामगृहात नवीन कलाकृतीने बदलण्यात आले आहे. हे लडाखमधील पँगॉन्ग त्सो, महाभारत-प्रेरित थीम आणि आधुनिक युद्धाचे चित्रण करते, कदाचित चीनच्या उत्तर सीमेवर भारताचे वाढणारे धोरणात्मक लक्ष प्रतिबिंबित करत असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. लष्कराच्या या खुलाशामुळे दोन दिवस सुरू असलेल्या वादावर आता पडदा पडला आहे.

India Vs Pakistan
BJP on One Nation One Election : नेहरू, इंदिरा गांधी अन् राजीव गांधींचाही उल्लेख करत भाजपने सांगितलं 'वन नेशन, वन इलेक्शन' आणण्याचं कारण!

विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर भारताचा लष्करी इतिहास आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारचा वारसा कमी केल्याचा आरोप केला. पाकिस्तानचे सैन्य भारतीय सैन्यसमोर आत्मसमर्पण करत असल्याचा फोटो सैन्यदलाच्या मुख्यालयातून हटवण्यात आला आहे. ही खूप दुर्दैवी बाब आहे. तो फोटो भारताच्या नेतृत्वाचा आणि सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाचा ऐतिहासिक फोटो आहे. हा फोटो पूर्वीच्या जागी लावला जावा, अशी मागणी खासदार प्रियांका गांधींकडून करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com