Nagpur News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. सत्तास्थापनेचा दावा, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री शपथविधी,मंत्रिमंडळ विस्तार असे सगळे सरकारी सोपस्कार पार पडल्यानंतर आता महायुती सरकारनं पुढचं पाऊल टाकलं आहे.
महायुतीच्या 230 पैकी 132 जागा जिंकत भाजप (BJP) सर्वात मोठा भाऊ ठरला होता. एकीकडे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी- विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे विधान परिषद सभापतीच्या निवडणूक चर्चेत आली आहे.
विधान परिषद सभापतीच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आता राम शिंदे (Ram Shinde) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शिंदे यांनी सोशल मीडियावरील X माध्यमांवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.ते उद्या बुधवारी(ता.18) विधानपरिषद सभापती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुती सरकारच्या सत्तास्थापनेनंतर राहुल नार्वेकर यांची पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपकडून विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांना संधी मिळणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.
भाजपकडून राम शिंदे यांना विधान परिषदेची आमदारकी देत त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीत कर्जत -जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला आहे. निवडणुकीत शिंदेंना निसटता पराभव स्विकारावा लागला.
आता राम शिंदेंना भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या हिवाळी अधिवेशनादरम्यानच आमदार शिंदे हे विधानपरिषद सभापतीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.ते बुधवारी सकाळी भाजपकडून अर्ज भरणार आहेत.त्यामुळे पराभवानंतर राम शिंदेंचं पुनर्वसन करुन त्यांना ताकद दिली असल्याची चर्चा आहे.
भाजप आमदार राम शिंदेंनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणूक माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.