Indian Economy : चिंताजनक! परकीय गंगाजळीमध्ये 10 महिन्यांचा नीचांक, रुपयाची ऐतिहासिक घसरण; काय घडतंय?

Foreign Exchange in India Rupees Dollar : आर्थिक वर्ष 2025 मध्ये देशाचा जीडीपीही अपेक्षेपेक्षा कमी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.  
Indian Economy
Indian EconomySarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काही दिवसांपूर्वीच्या देशाच्या जीडीपीबाबत चिंता वाढवणारी बातमी आली होती. जीडीपीचा दर अपेक्षेपक्षा कमी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच आता देशाच्या परकीय गंगाजळी म्हणजे परकीय चलन साठ्याने मागील दहा महिन्यांचा नीचांक गाठला आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीतही ऐतिहासिक घसरण झाली आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीबाबत नेमकं काय चित्र आहे, यावरून आता उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकड्यांनुसार, देशाचा 3 जानेवारीपर्यंतचा परकीय चलन साठा 634 अब्ज डॉलरपर्यंत खाली गेला आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 704.89 अब्ज डॉलर होता. मागील तीन महिन्यांतच त्यामध्ये तब्बल 70 अब्ज डॉलरची मोठी घट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शेअर बाजार विश्लेषक संदीप सभरवाल यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या धोरणांना त्यासाठी जबाबदारी धरले आहे.  

Indian Economy
Assembly Election Campaign : कुणी 100, कुणी 1000 रुपये द्या! खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच निवडणुकीसाठी क्राऊड फंडिंग

सभरवाल यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय परकीय चलन साठा 640 अब्ज डॉलरपर्यंत खाली आला आहे. मागील आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी विकासाला वाढवून-चढवून सांगितले. रोकड मर्यादित ठेवली आणि व्याजदर जास्त ठेवले. त्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली. अनेक लोकांनी त्यांचे कौतुक केले पण त्यांची धोरणे योग्य नव्हती. त्याचे परिणाम आता देशाला भोगावे लागत आहेत.

रुपया स्थिर ठेवण्यासाठी आरबीआयनी राबवलेल्या धोरणांवर सभरवाल यांनी टीका केली आहे. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक पातळीवर घसरली आहे. काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियांका गांधी यांनी यावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एका डॉलरची किंमत 86.4 रुपये झाली आहे, असे प्रियांका यांनी म्हटले आहे.

Indian Economy
Delhi BJP Candidates List: आप अन् काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या 8 जणांना तिकीट; दिल्लीसाठी BJP ची दुसरी यादी जाहीर

डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात डॉलरची किंमत 58-59 रुपये होती, त्यावेळी नरेंद्र मोदी हे रुपयाच्या किंमतीला सरकारच्या अब्रुशी जोडत होते. म्हणत होते, ‘मला सगळं माहिती आहे. कोणत्याही देशाचे चलन असे खाली येऊ शकत नाही…’ आज ते स्वत: देशाचे पंतप्रधान आहेत आणि रुपयाने नीचांकीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. देशातील जनतेला त्यांनी उत्तर द्यायला हवे, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com