
India Team in Davos : दावोसमध्ये सध्या जगभरातील नेते जमलेले आहेत. प्रत्येक जण आपल्या देशासाठी गुंतवणूक मिळवण्यस तेथे पोहचलेला आहे. या दरम्यान दावोसमध्ये भारताबाबत प्रेम आणि समर्पणाची भावना दर्शवत, पक्षाच्या चाकोरी बाहेर पडून सर्वच केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्री आणि अन्य राज्यमंत्र्यांनी एकजुट दर्शवल्याचे दिसून आले. दावोसमध्ये भारताच्या विकासगाथेला अधिक पुढे नेण्यासाठी भारतीय नेते एका मंचावर दिसले.
भारताने दावोसमध्ये(Davos) विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक कार्यक्रमात आपले आतापर्यंतचा सर्वात मोठे प्रतिनिधीमंडळ पाठवलेले आहे. ज्यामध्ये शासकीय अधिकारी, नागरिक समाजाचे सदस्यांशिवाय पाच केंद्रीयमंत्री, तीन मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचाही समावेश आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील भाजप(BJP) नेतृत्वातील एनडीए सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी अनेक अन्य राजकीय नेत्यांसोबत एका पत्रकारपरिषदेत म्हटले की, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे असू शकतो, परंतु जेव्हा आम्ही दावोसमध्ये येतो तेव्हा आम्ही सर्वजण एकच आहोत. मुख्यमंत्री नायडू यांनी जोर देत म्हटले की, भारत प्रथम, आमची लोकं प्रथम हाच आमचा नारा आहे.
नायडू म्हणाले की, एका देशाच्या रूपात भारत आर्थिक सुधारणा, तंत्रज्ञानाचा योग्य वेळेवर अवलंब, लोकसंख्यीक लाभांश, स्थिर विकास दर आणि सरकारच्या अतिशय मजबूत धोरणासोबतच चांगल्या स्थितीत आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतचा ब्रॅण्ड अतिशय मजबूत आहे. त्यांनी म्हटले की, दावसमध्ये टीम इंडियाच्या रूपात भाग घेणारे विविध दलाचे नेते जगाला योग्य संदेश देत आहेत.
तर याप्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही टीम इंडियाची भावना सांगितली. ते म्हणाले, आपण एक भारत बघू शकतो आणि मला वाटतं की हे सरकारी आणि प्रतिस्पर्धी संघवादाचं एक मोठं उदाहरण आहे. ज्यानुसार आपण एका स्वरात बोलत आहोत. परंतु सोबतच आपण व्यापारासाठी प्रतिस्पर्धाही करत आहोत. आपण आपल्या राज्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी प्रतिस्पर्धा करत आहोत आणि मला वाटतं की सहकारी आणि स्पर्धात्मक संघवादात यावरच विाचर केला जात आहे.
याशिवाय डीएमकेचे नेते अन् तामिळनाडूचे मंत्री टीआरबी राजा यांनीही दावोसमध्ये टीम इंडियाबाबत सांगितले. ते म्हणाले, भारतापेक्षा वेगळा नाही, परंतु मला वाटतं की एक राष्ट्र म्हणून आम्ही इथे जे प्राप्त केले आहे. त्यावर आपण आश्चर्यचकित झालं नाही पाहिजे. खरंतर जगाला भारताची गरज आहे आणि मला वाटतं की आपण याचा लाभ घेण्याच्या स्थितीत आहोत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.