Uday Samant : दावोस दौरा सोडून सामंत मुंबईत; ठाकरेंना देणार सर्वात मोठा धक्का, आमदारांचा आकडा अन् ठिकाणही सांगितलं...

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Ratnagiri News : जागतिक आर्थिक परिषदेसाठी उद्योग मंत्री उदय सामंत दावोसला गेले होते.
Uday Samant, Uddhav Thackeray
Uday Samant, Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे गुरूवारी दावोस दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. मुंबईत पाऊल ठेवताच त्यांनी राजकीय धमाक्याचे संकेत दिले. त्याची सुरूवात शुक्रवारी रत्नागिरीतून होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

सामंत यांनी ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देण्याबाबत भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरेंच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे. सोडून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यातच सामंत यांनी आजी-माजी आमदार, खासदारांचा आकडा सांगत ठाकरेंना हे प्रवेश रोखून दाखवण्याचे आव्हानही दिले आहे.

Uday Samant, Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : भाजपच्या मंत्र्यांवर संघाची नजर? बावनकुळेंनी सांगितलं नेमकं कारण...

मुंबई विमानतळावर मीडियाशी बोलताना सामंत म्हणाले, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासूनच उबाठाला खिंडार पडायला सुरूवात होत आहे. त्याचा पहिला ट्रेलर रत्नागिरीत पाहायला मिळेल. चार उबाठाचे आणि पाच काँग्रेसचे आमदार, तीन उबाठाचे खासदार, दहा माजी आमदार आणि असंख्य पदाधिकारी शिवसेनेत सामील होत आहेत.

उद्या रत्नागिरीत पहिला पक्ष प्रवेश आहेत. तिथे काही माजी आमदार उबाठा सोडून शिवसेनेत येणार आहेत. रत्नागिरीतून कोल्हापूरमार्गे सांगलीत येणार आहे. सांगलीतून साताऱ्यात आणि साताऱ्यातून पुण्यात येणार आहे. हा पहिला टप्पा आहे, असे सांगत त्यांनी कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही ठाकरेंना धक्का देणार असल्याचे स्पष्ट केले.

Uday Samant, Uddhav Thackeray
Shivsena UBT Marathwada : पक्षाला लागलेली गळती उद्धव ठाकरे कशी रोखणार?

माझी बदनामी करणाऱ्यांनी हे पदाधिकारी आमच्या पक्षात येण्यापासून रोखून दाखवावेत, असे आव्हानही सामंतांनी दिले. पुढील तीन महिन्यांत हे सगळे आमच्या पक्षात येतील. दररोज एक ब्रेकिंग न्यूज मिळेल, हा शब्द असल्याचे सामंत म्हणाले.

ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, त्यांचा राजकीय उदय करण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करत आहेत. हा माझा मोठेपणा आहे. असल्या बालीशपणाने माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दरी निर्माण होणार नाही, असे प्रत्युत्तर सामंत यांनी विरोधकांना दिले आहे. सामंत यांच्यासोबत शिवसेनेतील 20 आमदार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com