Santosh Deshmukh Murder Case : पंकजा मुंडेंचा व्हिडिओ काॅल, संतोष देशमुखांच्या पत्नीने एका वाक्यात मनातलं सांगितलं

santosh deshmukh murder case Pankaja Munde Call Deshmukh Family : पंकजा मुंडे यांचा फोन आला होता याची माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
Pankaja Munde ashwini deshmukh
Pankaja Munde ashwini deshmukhsarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबीयांना मंत्री पंकजा मुंडे या भेटायला गेल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. आमदार सुरेश धस यांनी जाहीर सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेण्याचे आवाहन केले होते. नुकतेच पंकजा मुंडे यांनी आपण देशमुख कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार होतो मात्र त्यांनी सांगितले की वातावरण ठीक नाही तुम्ही येऊ नका. आपण त्यांच्याशी फोनवर बोललो.

पंकजा मुंडे यांचा फोन आला होता याची माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली. ते म्हणाले धनंजय मुंडेंनी साधा फोनही केला नाही मात्र पंकजा मुंडेंनी व्हिडिओ काॅल केला होता. त्यांच्यासोबत आपल्या वहिनी आश्विनी देशमुख या बोलल्या.

Pankaja Munde ashwini deshmukh
Kokan Politics : गोगावलेंची कट्टर विरोधक अन् ठाकरेंची वाघीण भाजपच्या वाटेवर; एका दगडात दोन पक्षी मारणार...

संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी पंकजा मुंडेंना व्हिडिओ काॅलवर आम्हाला न्याय दिल्यावरच भेटायला या, असे सांगितले. पंकजा मुंडे यांनी देखील काही दिवसांपूर्वी मी देशमुख कुटुंबीयांना भेटायला जाण्याआधी त्यांच्यापर्यंत न्याय गेला पाहिजे.

Pankaja Munde ashwini deshmukh
Delhi Vidhan Sabha Election 2025 : योगींचा महाराष्ट्रात दिलेला 'बटेंगे तो कटेंगेचा' नारा भाजपला दिल्लीतही तारणार का?

संतोष देशमुख हा आपलाच कार्यकर्ता होता. भेटायला जायचे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे त्याचे प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही. देशमुख यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही. माझ्या ईश्वराला,मला, जनतेला आणि देशमुख परिवाराला हे माहिती आहे या विषयी मला पूर्ण सहानूभुती आहे, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कराडसोबत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक असलेल्या नऊ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मकोकाच्या कारवाईमुळे पुढील सहा महिने कराड तुरुंगाबाहेर येऊ शकत नाही. त्याला जामीनासाठी अर्ज देखील करता येणार नाही.

Pankaja Munde ashwini deshmukh
Delhi Vidhan Sabha Election 2025 : योगींचा महाराष्ट्रात दिलेला 'बटेंगे तो कटेंगेचा' नारा भाजपला दिल्लीतही तारणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com