
Mumbai News : मागील काही महिन्यांपासून सातत्याने घसरण होत असलेल्या भारतीय शेअर बाजाराने 28 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे तब्बल 92 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी 1996 मध्ये सलग पाच महिने शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. या अभूतपूर्व घसरणीमुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील पाच महिन्यांत सेंसेक्स 11.54 टक्क्यांनी पडला आहे. तर निफ्टीमध्ये 12.65 टक्क्यांची घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील भांडवलामध्ये मोठी घसरण झाली आहे. हे भांडवल 26 सप्टेंबर 2024 पासून जवळपास 25 लाख कोटी कमी झाले आहे. तर बीएसई-लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे 92 लाख कोटींनी घटले आहे.
विदेशी गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने शेअर बाजारात भूकंप आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, अमेरिकी बाँडची वाढती मागणी त्याचप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय़ घेतल्यानेही त्याचा बाजारावर मोठा परिणाम झाला आहे.
मार्च महिन्यांत तरी मार्केट तेजीत राहणार का, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम वाढला आहे. साधारणपणे मार्च महिन्यात बाजारात नेहमीच तेजी राहिली आहे. गुंतवणुकदारांना कमाई करून देणारा हा महिना असतो. त्यामुळे गुंतवणुकदारांसह अर्थतज्ज्ञांचे लक्षही सोमवारी (ता. 1 मार्च) बाजार उघडण्याकडे असेल. बाजार उघडताच कोणत्या दिशेने जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजार 1414 अंकानी तर निफ्टीमध्ये 420 अंकांची घसरण झाली मुंबई बाजार 73198 अंकांवर बंद झाला. बीएसईमधील टॉप 30 शेअर्सपैकी 29 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सर्वाधिक 6 टक्के घसरण टेक महिंद्रा कंपनीच्या शेअर्समध्ये झाली. सप्टेंबरपासून टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 35 टक्के घसरण झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.