Trump Tariff Impact: ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचा धमाका; अवघ्या 10 सेंकदात शेअर मार्केटमध्ये 19 लाख कोटींची राखरांगोळी

Trump Tariff Impact on Stock Market : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ कराचे भारतीय शेअर मार्केटला बसले आहेत. सोमवारी (7 एप्रिल) सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 3 हजार अंकानी कोसळला, तर निफ्टीही 1 हजार अंकानी कोसळला.
Trump trade policy effect
Trump trade policy effectSarkarnama
Published on
Updated on

Indian Share Market Crash: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ कराचे भारतीय शेअर मार्केटला बसले आहेत. सोमवारी (7 एप्रिल) सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 3 हजार अंकानी कोसळला, तर निफ्टीही 1 हजार अंकानी कोसळला.

त्यामुळे सकाळी अर्ध्या तासाच्या आताच गुंतवणूकदारांच्या कोट्यावधी रुपयांची राखरांगोळी झालेली पाहायला मिळाली. अवघ्या 10 सेकंदात 19 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे 'मनी कंट्रोल' या आर्थिक वृत्तवाहिनीने सांगितले आहे.

शेअर मार्केटमध्ये कोरोनानंतरची ही सर्वात मोठी पडझड असून आजच्या दिवसाची ब्लॅक मंडे म्हणून नोंद झाली आहे. या पडझडीमुळे बाराजपेठेत मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कंपन्यांनाही दिवाळखोरीची भीती निर्माण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 85.24 वरून 85.74 वर गेला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतही कमी झाल्या आहेत.

Trump trade policy effect
Narendra Modi : नरेंद्र मोदींची '2029'कडे वाटचाल; 'वक्फ'निमित्ताने मोदींची 'एनडीए'वर पकड घट्ट!

ट्रम्प यांच्याविरोधात जगभरातून संतापाची लाट :

डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखले जातात. त्यांचा टॅरिफ लागू करण्याचा निर्णय देखील असाच धक्कादायक मानला जात आहे. पण या निर्णयानंतर त्यांच्याशी 50 देशांनी चर्चा केली आहे. त्यामुळे काही बाबी रुळावर येण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांच्या इतर निर्णयांवरही अमेरिकेचे नागरिक नाराज असून 50 राज्यांमध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे.

Trump trade policy effect
PM Narendra Modi : अखेर मोदींकडून तमिळनाडूतील राजकीय हालचालींवर पहिला वार; दुखरी नस पकडली...

सरकारी कर्मचाऱ्यांची कपा करणे, आयात शुल्कामुळे महागाई वाढीची भीती, एलजीबीक्युटी समुदायाविरोधातील अध्यादेश, स्थलांतरितांना देशाबाहेर काढणे, सामाजिक सुरक्षा विभाग बंद करणे अशा निर्णयांचा निषेध केला जात आहे. अमेरिकन नागरिकांनी हँन्ड्स ऑफ या नावाने शांततापूर्ण आंदोलन सुरू केले आहे. यात डोनाल्ड ट्रम्प आणि मंत्री इलॉन मस्क यांची हकालपट्टी करावी अशी प्रमुख मागणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com