PM Narendra Modi : अखेर मोदींकडून तमिळनाडूतील राजकीय हालचालींवर पहिला वार; दुखरी नस पकडली...

PM Modi language row MK Stalin controversy : मागील काही महिन्यांत तमिळनाडूमध्ये हिंदी भाषेवरून सत्ताधारी द्रमुकसह काँग्रेसही आक्रमक झाली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तमिळनाडूच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून सत्ताधारी द्रमुकवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांनी राज्यातील 8300 कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण करताना भाषेच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले आहे.

मागील काही महिन्यांत तमिळनाडूमध्ये हिंदी भाषेवरून सत्ताधारी द्रमुकसह काँग्रेसही आक्रमक झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषीय धोरण अवलंबण्यात आले आहे. त्याला द्रमुकचा जोरदार विरोध आहे. त्यामुळे या धोरणाची राज्यात अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

PM Narendra Modi
Deenanath Hospital Case : घैसास क्लिनिकमधील तोडफोड खासदार कुलकर्णींच्या जिव्हारी; भाजप शहराध्यक्षांना पत्र लिहित म्हणाल्या, कुठल्यातरी सोम्या गोम्या...

पंतप्रधान मोदींनी या वादावर रविवारी पहिल्यांदाच भाष्य करताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, तमिळनाडूतील अनेक नेत्यांची मला पत्र येतात. पण त्यावर कधीही तमिळ भाषेत स्वाक्षरी नसते. तमिळ भाषेचा एवढाचा गर्व असेल तर तमिळमध्येच सही करायला हवी, असा जोरदार टोला पंतप्रधानांनी लगावला.

तमिळ भाषा आणि तमिळ वारसा पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडीचे सरकार असूनही केंद्र सरकार राज्याला आधीपेक्षा तीनपट अधिक निधी देत आहे. त्यामुळे राज्याची प्रगती थांबली नाही. आज औद्योगिक क्षेत्रात तमिळनाडू देशातील सर्वात वरच्या स्थानावर असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

PM Narendra Modi
Ajit Pawar : बीडचं वारं बारामतीत! तरुणाला अमानुषपणे मारहाण, थेट अजितदादांनी घातलं लक्ष; म्हणाले, जवळचा कार्यकर्ता असला तरी...

देशातील तरूणांना डॉक्टर बनण्यासाठी विदेशात जाण्याची गरज नाही. त्यासाठी मागील काही वर्षांत तमिळनाडूला 11 मेडिकल कॉलेज मिळाली आहेत. आता गरीब मुलांनाही डॉक्टर बनता येऊ शकते. तमिळनाडू सरकारला सांगू इच्छितो की, त्यांनी तमिळ भाषेत मेडिकल कोर्स करावेत. जेणेकरून इंग्रजी भाषा न येणाऱ्या मुलांना डॉक्टर बनता येईल, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी यावेळी केले.

तमिळनाडूला सरकारने दिलेल्या निधीवर पंतप्रधानांनी सातत्याने भर दिला. वर्ष 2014 मध्ये रेल्वेसाठी केवळ 900 कोटी रुपये मिळायचे. यावर्षी तमिळनाडूला 6 हजार कोटींहून अधिक निधी केंद्र सरकारने दिला आहे. 77 रेल्वे स्थानके आधुनिक होत आहेत. त्यामध्ये रामेश्वरम स्थानकाचाही समावेश असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तमिळनाडूचे सामार्थ्य जेवढे वाढेल, तेवढ्याच वेगाने देशाचा विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com