Indira Gandhi Sardar Patel rare photo : इंदिरा गांधी अन् सरदार पटेलांचे नाते कसे होते? काँग्रेसने शेअर केला 1947 मधील दुर्मिळ फोटो!

Indira Gandhi and Sardar Vallabhbhai Patel relationship : इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे नेमके नाते काय होते? काँग्रेसने 1947 मधील दुर्मिळ फोटो शेअर केला असून, या ऐतिहासिक फोटोची चर्चा सुरू झाली आहे.
Indira Gandhi and Sardar Vallabhbhai Patel relationship
Indira Gandhi and Sardar Vallabhbhai Patel relationshipSarkarnama
Published on: 
Updated on: 

भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणूनही पाळला जातो. तसेच इंदिरा गांधी यांचा आज स्मृतिदिनही आहे. यानिमित्ताने काँग्रेसने सरदार पटेल यांना अभिवादन करत एक दुर्मिळ ऐतिहासिक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या फोटोमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू दिसत आहेत. या छायाचित्रामुळे इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्यातील संबंधांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Indira Gandhi and Sardar Vallabhbhai Patel relationship
उमर अब्दुल्ला 56 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात; कोण आहे दुसरी पत्नी; समोर आले खास फोटो!

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हे छायाचित्र शेअर केले आहे. त्यासोबत त्यांनी दोन्ही नेत्यांच्या कार्याचा आणि देशाच्या इतिहासातील योगदानाचा उल्लेख केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, "दो भारतीय, दोनों ही अडिग और दृढ़ संकल्प वाले. दोनों ने भारतीय उपमहाद्वीप के भूगोल और इतिहास को आकार दिया."

यापुढे त्यांनी सरदार पटेल यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि देशाची एकता प्रत्यक्षात साकार करणाऱ्या नेत्याची ही 151 वी जयंती आहे. तसेच, पुढील काळात देशात आलेल्या श्वेतक्रांतीच्या प्रेरणेमागेही त्यांचे योगदान होते. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचाही यावेळी जयराम रमेश यांनी उल्लेख केला. स्वतंत्र भारताला अणुऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रात सामर्थ्यशाली बनवण्यात तसेच हरितक्रांतीला गती देण्यात इंदिरा गांधी यांची भूमिका महत्त्वाची होती, असे त्यांनी म्हटले.

Indira Gandhi and Sardar Vallabhbhai Patel relationship
Breaking News : शिवसेना नेत्यावरील गोळीबार प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय; छोटा राजनसह 5 आरोपींची निर्दोष मुक्तता!

नोव्हेंबर 1947 मधील ऐतिहासिक छायाचित्र

जयराम रमेश यांनी शेअर केलेला हा फोटो नोव्हेंबर 1947 च्या सुरुवातीचा आहे. नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आशियाई प्रादेशिक परिषदेतील प्रतिनिधींच्या सन्मानार्थ तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी टिपलेल्या या छायाचित्रात 30 वर्षांच्या इंदिरा गांधी 72 वर्षांच्या उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचे अभिवादन करताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.