POK : “आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावलं

S. Jaishankar On POK And indus water : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या ताणावाचा वातावरण ऑपरेशन सिंदूरनंतर आता हा वाद शांततेकडे वाटचाल करत आहे. पण आता भारताने आपली भूमिका आणखीन कठोर केली आहे.
S. Jaishankar On POK And indus water
S. Jaishankar On POK And indus watersarkarnama
Published on
Updated on

Navi Delhi News : पहगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करत 26 भारतीय पर्यटकांची हत्या केली होती. याचा बदला भारताने थेट ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. यानंतर आता भारताने आखीन कठोर भूमिका घेतल्याचे याआधीच परराष्ट्रमंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी पाकिस्तानला खडसावतं चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरवरच केली जाईल असे म्हटलं आहे. तसेच या प्रश्नात तिसऱ्या कोणाचा हस्तक्षेप देखील खपवून घेणार नसल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. ते दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी त्यांनी, पाकिस्तानबरोबर भारताचे संबंध आणि व्यवहार हे पूर्णपणे द्विपक्षीयच असतील. जे गेल्या वर्षांपासून सुरू आहेत. यात आता कोणाताही बदल झालेला नाही आणि होणारही नाही. आणि येथून पुढे पाकिस्तानशी फक्त चर्चेसाठी काश्मीर एकमेव मुद्दा असेल.

सिंधू करारहा स्थगित राहणार असून पाकिस्तानशी आता दहशतवाद आणि पीओकेवर चर्चा होईल. पाकिस्तानकडे दहशतवाद्यांची यादी असून ती त्यांनी आम्हाला द्यावी. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा बंद कराव्यात. याबाबत त्यांना काय करायचे ते त्यांनी ठरवायचे आहे. याबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत. पाकिस्तानबरोबर दहशतवाद आणि पीओके असे मुद्दे आहेत ज्यावर चर्चा शक्य असल्याचेही जयशंकर म्हणालेत.

S. Jaishankar On POK And indus water
S. Jaishankar : जयशंकर यांना मिळालं सर्वोच्च संरक्षण; Z+ सुरक्षा म्हणजे नेमकं काय?

हस्तक्षेप न करण्याचा पर्याय होता

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या लष्करी कारवाई का थांबवली यांच्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, तेथे दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधा आम्ही नष्ट केल्या आहेत. हे आम्ही साध्य केलं आहे. ज्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेतलीय. याचे कारणही तसेच असून ऑपरेशनच्या सुरू करण्याआधीच याची कल्पना आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवून दिली होती.

भारत हा पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात लढत नसून दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करणार आहे. यामुळे त्यांच्या लष्कराकडे यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताच पर्याय नव्हता. त्यांना याच्या आधी आम्ही जो सल्ला दिला होता तो त्यांनी मान्य केला नाही. याचा त्यांना 10 मे रोजी सकाळी जोरदार फटका बसला. हे नुकसान उपग्रह छायाचित्रांवरूनही दिसून येतं. तर त्यानंतरर कोण शस्त्रविराम करण्याची इच्छा व्यक्त केली हो देखील आता स्पष्ट होत आहे.

S. Jaishankar On POK And indus water
S Jaishankar News : मोठी बातमी : खलिस्तान्यांकडून एस जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, तिरंगा फाडला...  

तसेच होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी जयशंकर म्हणाले, 'आमच्यासाठी होंडुरासमध्ये नवीन दूतावास असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ज्या देशांनी भारताबद्दल दृढ एकता व्यक्त केली त्यापैकी हे एक आहेत. आपण त्याचे कौतुक करत असल्याचेही जयशंकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com