ED News : काँग्रेसच्या खासदारावर ED ची मोठी कारवाई ; कोट्यवधींची संपत्ती...

ED Action on Karti Chidambaram : चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी ५० लाख लाच घेतल्याच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
CBI raid Karti Chidambaram
CBI raid Karti Chidambaram Sarkarnama
Published on
Updated on

ED Action on Karti Chidambaram : काँग्रेसचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री पी. चिंदबरम यांचे सुपुत्र कार्ती चिंदबरम यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने ( ED) मोठी कारवाई केली आहे. मनी लाँन्ड्रीग प्रकरणात त्यांची ११ कोटी ४ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

कार्ती चिंदबरम हे तामिळनाडू येथील शिवगंगा लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार आहेत. त्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI)आणि ईडीने अटक केली होती. बेकायदा संपत्ती जमा केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे

CBI raid Karti Chidambaram
Congress News : धक्कादायक : काँग्रेस महिला अध्यक्षाचा दोन नेत्यांकडून छळ ; राहुल गांधींनी दखल न घेतल्यामुळे महिला आयोगाकडे धाव..

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयने एकाच वेळी कार्ती यांच्याशी संबंधित ११ ठिकाणी धाड टाकली होती. २५० चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी ५० लाख लाच घेतल्याच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

CBI raid Karti Chidambaram
Pune By Elections News: पोटनिवडणुक जाहीर होण्याआधीच प्रशांत जगताप भावी खासदार ?; NCP कडून दुसऱ्यांदा बॅनरबाजी

कार्ती यांच्यावर चीनी नागरिकांना व्हिसा पुरवल्याच्या घोटाळा प्रकरणात खटला दाखल केला आहे. कार्ती यांच्याशी संबंधित ११ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणलाही सीबीआयने अटक केली होती.पी चिदंबरम गृहमंत्री असतानाचे हे प्रकरण (२०११)आहे. कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात भक्कम इलेक्ट्रॉनिक आणि इतर पुरावे असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

CBI raid Karti Chidambaram
MVA Politics: 'मविआ' मध्ये पहिली ठिणगी पडली ; राऊत म्हणाले, 'अजितदादाचं का ऐकून घेऊ ? ; मी शरद पवारांचेच ऐकतो, कुणाच्या बापाला..

कार्ती चिदंबरम यांची अनेक गुन्ह्यांशी संबंधित चौकशी सुरु आहे. यामध्ये एअरसेल-मॅक्सिस डील आणि INX मीडियाला 305 कोटी रुपयांचा परदेशी निधी प्राप्त करण्यासाठी विदेशी गुंतवणूक मंडळाच्या मंजुरीशी संबंधित अनेक गुन्हे प्रकरणांत अशांचा समावेश आहे. सीबीआयने 15 मे 2017 रोजी INX मीडियाविरोधात एफआयआर नोंदवला होता.

काय आहे प्रकरण ...

शेडोंग इलेक्ट्रिक पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या चिनी कंपनीला पंजाबमधील मानसा येथे पॉवर प्लांट बांधण्यासाठी तलवंडी साबो पॉवर लिमिटेडकडून कंत्राट मिळाले होते. पॉवर प्लांटच्या बांधकामात होणारा विलंब आणि वेळेवर काम पूर्ण न केल्याने मोठा दंड टाळण्यासाठी अतिरिक्त चिनी तज्ज्ञ आणण्याची सेप्कोला नितांत गरज होती.गृह मंत्रालयाने मर्यादित संख्येने व्हिसा जारी केल्यामुळे सेप्को तज्ज्ञ आणू शकले नाही.

CBI raid Karti Chidambaram
Mumbai Mantralaya News: 'मिशन लोटस्'च्या अफवेनंतर मंत्रालयात 'यांचा' सुळसुळाट ; फायलींचा होतोयं जलद 'निपटारा'

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, टीएसपीएलचे उपाध्यक्ष विकास मखरिया यांनी पी चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमन यांच्याशी संपर्क साधला. भास्कर रमन यांनी ५० लाखांच्या मोबदल्यात काम करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चिनी कंपनीच्या २६३ तज्ज्ञांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यात आली. यानंतर मुंबईतील बेल टूल्स लिमिटेड या कंपनीला बनावट पावत्यांद्वारे ५० लाख रुपये पाठवण्यात आले आणि तेथून ही रक्कम भास्कर रमन आणि कार्ती चिदंबरम यांच्यापर्यंत पोहोचली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com