US Israel strikes Iran response : ट्रम्प यांनी डिवचताच इराणने जारी केली 8 ठिकाणांची हिट लिस्ट; आखात हादरले, प्लॅन तयार

Iran Gulf Hitlist | US Israel Strike Tensions Rise : अमेरिका आणि इस्त्रायलकडून गुरूवारी बी वन पुलावर दोनदा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून पूलाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Heightened military alert in the Gulf region after Iran’s warning following US-Israel strikes.
Heightened military alert in the Gulf region after Iran’s warning following US-Israel strikes.Sarkarnama
Published on
Updated on

Iran gulf tensions news : अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. इराणकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. या हल्ल्यांमध्ये इराणसाठी महत्वाचा मानला जाणारा एक पूल उद्ध्वस्त झाला आहे. त्यानंतर संतापलेल्या इराणनेही आठ महत्वाच्या ठिकाणांची हिटलिस्ट जाहीर करत जगाला हादरविण्याचा प्लॅन तयार केल्याने खळबळ उडाली आहे.

इराणीयन मीडियाने शुक्रवारी पश्चिम आशियातील महत्वाच्या मुलांची लिस्ट प्रसिध्द केली आहे. ‘जशास तसे’ असे म्हणत इराणने हे पूल उडवून देण्याची धमकी दिली आहे. कराजमधील बी वन हा इराणसाठी महत्वाचा पूल अमेरिका-इस्त्राईलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे इराणचा महत्वाच्या शहरांशी असलेल्या संपर्क तुटला आहे.

यापार्श्वभूमीवर इराणनेही आखाती देशांमधील आठ पुलांची नावे जाहीर केली आहेत. अमेरिका व इस्त्रायलला या देशांमधून मदत केली जात असल्याने इराणकडून या देशांनाही टार्गेट केले जात आहे. इराणच्या हिटलिस्टमध्ये कुवेत आणि बहारीनमध्ये एक, यूएईमधील दोन आणि जॉर्डनमधील तीन ठिकाणांचा समावेश आहे.

Heightened military alert in the Gulf region after Iran’s warning following US-Israel strikes.
CID investigation : सरन्यायाधीशांना मध्यरात्री दखल घ्यावी लागलेल्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सापडला; भाजपने केलेले आरोप ठरले फोल...

कुवेतमधील शेख जबर अल अहमद अल साबेर समुद्री पूल, बहारीन आणि सौदी अरेबियाला जोडणारा किंग फहाद पूल, यूएईमधील शेख झायेद पूल आणि सेख खलिफा पूल तर जॉर्डनमधील किंग हुसेन पूल, दामिया पूल आणि अबडाऊन पूलांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. आखाती देशांसाठी हे पूल महत्वाचे मानले जातात.

दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलकडून गुरूवारी बी वन पुलावर दोनदा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून पूलाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे हा पूल नव्यानेच उभारावा लागणार आहे. या पुलाची लांबी जवळपास एक किलोमीटर एवढी होती. तेहरान आणि कराज या दोन महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी हा पूल उभारण्यात आला होता.

Heightened military alert in the Gulf region after Iran’s warning following US-Israel strikes.
Teachers Recruitment : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी आता नवा नियम; निवड प्रक्रिया झाली आणखी कडक...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुलावरील हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला होता. उशीर होण्यापूर्वी डील अंतिम करावी, असा धमकी त्यांनी दिली होती. दरम्यान, आतापर्यंत या युध्दामध्ये १३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये इराणच्या सर्वोच्च नेत्यांसह अधिकाऱ्यांही समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com