Gas Price Hiked : युद्धाचा भडका! हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्री ठप्प? घरगुती गॅस सिलेंडरचे दर महाराष्ट्रात 900 पार

Iran vs Israel America War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाला असून या देशातील संघर्ष दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या संघर्षाचा परिणाम आता जगासह भारतावर देखील होताना दिसत आहे.
Commercial Gas Cylinder price Hikes
Commercial Gas Cylinder price HikesSarkarnama
Published on
Updated on
Summary

• इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी केल्यानंतर कच्च्या तेलासह एलपीजीच्या दरात वाढ झाली आहे.

• केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

• घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली असून महाराष्ट्रात 14.2 किलो सिलेंडरची किंमत 920 रुपये झाली आहे.

LPG Gas Shortage : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण संघर्षाचे पडसाद आता जगासह भारताच्या बाजारपेठांत उमटताना दिसत आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी करताच कच्चा तेल सह एलपीजीचे दर भडकले आहेत. याचा थेट परिणाम भारतात होताना दिसत असून केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबविला आहे. यामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्री उद्योग ठप्प होण्याची भीती आहे. तसेच यादरम्यान सर्व सामान्यांच्या खिशाला देखील इराण-इस्रायल संघर्षाची झळ बसली असून घरघुती गॅस सिलेंडरच्या किंमती 60 रूपयांनी भडकल्या आहेत. यामुळे 860 रुपयांना मिळणारं सिलेंडरसाठी महाराष्ट्रात 920 रुपये मोजावे लागणार आहेत. 14.2 किलोच्या घरघुती गॅस सिलेंडरसाठी नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्धामुळे दिवसागणिक संघर्ष वाढत आहे. या मात्र संघर्षामुळं प्रत्यक्ष युद्धात सहभागी नसलेल्या देशांना याचा परिणाम सोसावे लागत आहेत. जगासमोर कच्चा तेल एलपीजीच्या पुरवठ्याचं नवं संकट निर्माण झालं आहे. तर या युद्धाची झळ आता थेट भारतालाही बसताना दिसत आहे. इराण-इस्रायल संघर्षात इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत थेट तेल आणि एलपीजी वाहतूक करणाऱ्या जहाजांना लक्ष करू असा इशारा दिला आहे. यामुळे एलपीजी टँकरची वाहतूक विस्कळीत झाली असून भारतात याचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत.

Commercial Gas Cylinder price Hikes
LPG Gas Cylinder Price News: मोदी सरकारची मोठी घोषणा; दिवाळीआधीच सर्वसामान्यांना दिलं मोठं 'गिफ्ट'

भारत याच होर्मुझ सामुद्रधुनीतून आपल्या वापराच्या 80 टक्क्यांहून तेल आणि एलपीजी आयात करतो. पण आता होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल आणि एलपीजीची होणारी आयात ठप्प झाली आहे. यामुळे या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती गॅस आणि हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्री उद्योगाच्या एलपीजीच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारला मोठं पाऊल उचलावं लागलं आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने तातडीने सर्व रिफायनरी यांना एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे रिफायनरी कंपन्या त्यांच्याकडील प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील. मात्र आत्ताच्या घडीला घरघुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ सरकारने केली आहे. परिणामी राज्यात नागरिंका सिलेंडर गॅस 920 रुपयांना घ्यावा लागणार आहे.

याचबरोबर सर्वसामान्यांचे हाल रोखण्यासाठी केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय देखील घेतला आहे. सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून कमर्शियल वापराच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठ्यावर तात्पुरता ब्रेक लावला आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून हा उद्योग ठप्प होण्याची शक्यता आहे.

होर्मुझची नाकेबंदी

अमेरिका-इस्त्रायल यांनी इराण विरोधात संघर्ष तीव्र करत जोरदार मारा केला आहे. यामुळे संतापलेल्या इराणने जगाचे नाक दाबणारा निर्णय घेत होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी केलीय. याचा थेट परिणाम भारतावर झाला आहे. याच सामुद्रधुनीतून जगात दुसऱ्या क्रमांकावर एलपीजी भारत आयात करतो. अंदाजे 85 ते 90 टक्के म्हणजेच जवळजवळ दोन तृतीयांश एलपीजी मध्य पूर्वेतून आयात केला जातो. पण आता इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याने जागतिक बाजारपेठेवर याचा परिणाम झाला आहे. ज्याचे चटके आता भारताला बसत असून घरघुती गॅस सिलेंडरच्या किमती 60 रुपयांनी वाढल्या आहेत.

Commercial Gas Cylinder price Hikes
LPG Cylinder Price : सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी, LPG सिलिंडर झाले स्वस्त! पाहा आजचे नवे दर

FAQs :

1. गॅस सिलेंडरचे दर का वाढले आहेत?
इराण-इस्रायल संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी झाली असून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत.

2. घरगुती गॅस सिलेंडरची नवी किंमत किती आहे?
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत महाराष्ट्रात आता सुमारे 920 रुपये झाली आहे.

3. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा का थांबवला?
ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि घरगुती वापराला प्राधान्य देण्यासाठी सरकारने व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवला आहे.

4. या निर्णयाचा कोणत्या उद्योगांवर परिणाम होऊ शकतो?
हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

5. होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व काय आहे?
जगातील मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक या सामुद्रधुनीतून होत असल्याने येथे तणाव वाढल्यास जागतिक इंधन बाजारावर परिणाम होतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com