Vishakha Subehdar News : 'माझ्या मुलाला परत आणा...' मराठी अभिनेत्रीची मोदी-फडणवीसांना आर्त साद; व्हिडिओ शेअर

America-Israel-Iran War Vishakha Subehdar Son Stranded In Kuwait: कुवेतमध्ये त्यांचा मुलगा अडकला आहे. त्यामुळे दुबईतून नागरिकांना ज्या पद्धतीने परत आणले, तसेच कुवेतमधील भारतीयांनाही मदत करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
America-Israel-Iran Conflict
America-Israel-Iran ConflictSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धपरिस्थितीमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील अनेक नागरिक विदेशात अडकले आहेत. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यथा आणि भावना व्यक्त करीत आहेत. मायदेशी सुरक्षित परत येण्यासाठी ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडे तातडीने मदत मागताना दिसत आहेत.

अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर परिस्थिती अतिशय तणावपूर्ण आणि हिंसक झाली आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बदला घेण्याच्या भावना उफाळून आल्या आहेत.

कोणताही देश माघार घेण्यास तयार नसल्याने हल्ले अधिक तीव्र होत चालले असून, दोन्ही बाजूंनी सातत्याने मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत. यात हजारो लोकांचा बळी गेला आहे, असंख्य तळ, इमारती, शहरं आणि नागरी वस्त्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. मृत्यू आणि नुकसानाची नेमकी आकडेवारी सांगणे अशक्य झाले आहे.

अनेक भारतीय या आखाती देशांमध्ये अडकून पडले असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय ना बाहेर काढण्यासाठी शासनाकडून विविध कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांची मदत करण्यात येत आहे. तरी देखील अनेकांना मदत मिळाली नसल्याचं समोर येत आहे. अशातच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी व्हिडिओद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली आहे.

America-Israel-Iran Conflict
US-Israel War against Iran: इराणचा जहाजावर मोठा हल्ला; तीन भारतीयांचा मृत्यू

अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमध्ये त्यांचा मुलगा अडकला आहे. त्यामुळे दुबईतून नागरिकांना ज्या पद्धतीने परत आणले, तसेच कुवेतमधील भारतीयांनाही मदत करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

याबाबत विशाखा सुभेदार यांनी सांगितले माझा मुलगा लंडन येथे प्रवास करत होता. त्या प्रवासादरम्यान त्याचं कुवेत येथून कनेक्टेड फ्लाईट होतं. मात्र युद्ध परिस्थितीमुळे गेले चार दिवस विमानसेवा बंद असल्यामुळे तो कुवेत मध्ये अडकून पडला आहे. आता त्या ठिकाणची परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. माझा मुलगा ती परिस्थिती त्या ठिकाणी अनुभवत आहे. सातत्याने त्या ठिकाणी ड्रोन हल्ले होत आहेत.

America-Israel-Iran Conflict
बाळासाहेब ठाकरे, RSS नेत्यांच्या अटकेस नकार देणारा 'ट्रबलशूटर'अधिकारी; कोण आहेत के. पी. रघुवंशी

विमान कंपनी आणि भारतीय दूतावासाने त्यांची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली आहे. मात्र त्यांना आता भारतात परत आणण्याची व्यवस्था करण्यात यावी ज्या पद्धतीने दुबईतील लोकांना परत आणलं तसेच तेथील लोकांना देखील परत आणावं अशी विनंती माझी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना असल्याचं सुभेदार म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com