Iran supreme leader death : अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर ९ जुलैला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी इराणकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे पंतप्रधान इराणला जाणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली होती. अखेर त्यावर सोमवारी पडदा पडला आहे.
खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराचे कार्यक्रम ४ जुलैपासून सुरू होणार असून ९ जुलैला अंतिम कार्यक्रम इराणमधील पवित्र शहर मशहदमध्ये होणार आहे. खामेनेई यांचे पार्थिव शिया मुस्लिमांचे आठवे इमाम इमाम रजा यांच्या पवित्र दर्गा परिसरात दफन केले जाणार आहे.
अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी भारताकडून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सैयद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा हे प्रतिनिधित्व करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कालावधी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडच्या दौऱ्यावर असल्याने या दोघांची निवड करण्यात आल्याचे वृत्त 'न्यूज १८'ने दिले आहे.
दरम्यान, खामेनेई यांचा मृत्यू २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झाला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य काही सदस्यांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
युध्दामुळे इराणसह आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावामुळे खामेनेई यांच्यावर अंत्यसंस्काराला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. जवळपास ११६ दिवसांनंतर अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले जाणार आहेत. त्यासाठी भारतासह जगभरातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारत आणि इराणमधील संबंध मागील अनेक वर्षांपासून महत्वाचे मानले जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.