

Iran crude export news : अमेरिका आणि इस्त्रायलकडून सातत्याने हल्ले सुरूच असल्याने इराणकडून आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या होर्मूझ सामुद्रधुनी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. केवळ भारतासह काही देशांनाच हा मार्ग खुला करण्यात आला असला तरी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच एक महत्वाची घडामोड समोर आली आहे.
होर्मूझ सामुद्रधुनी पार करत भारताच्या दिशेने निघालेल्या एका तेलवाहू जहाजाने अचानक मार्ग बदलल्याची माहिती समोर आली आहे. इराणमधून तब्बल सात वर्षांनंतर तेलवाहू जहाज भारताच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले होते. २०१९ नंतर इराणमधून एकही तेलवाहू जहाज भारतात आलेले नाही.
इराणमधील युध्दाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना असामान्य असल्याची चर्चा आहे. हे जहाज आता अचानक चीनच्या दिशेने वळविण्यात आले आहे. अमेरिकेने प्रतिबंधित केलेल्या या जहाजावर कच्चे तेल आहे. शिप ट्रेकिंग फर्म केप्लरच्या माहितीनुसार, पिंग सून हे तेलवाहू जहाजाचे नाव आहे. या जहाजाची बांधणी २००२ मध्ये करण्यात आली होती. २०२५ मध्ये अमेरिकेने त्यावर बंदी घातली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी पार केल्यानंतर जहाजातून भारताच्या दिशेने निघाल्याचा संदेश पाठविण्यात आला होता. हे जहाज भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील वडीनार येथे पोहचण्याचे संकेत मिळाले होते. पण अचानक हे जहाज दक्षिणेकडे वळाले. अद्यापही या जहाजाचे अंतिम ठिकाण निश्चित नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जहाजाबाबत गुढ वाढले आहे.
भारतामध्ये हे जहाज आल्यास मोठी घटना ठरणार आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच एखादे इराणी तेलवाहू जहाज भारतात दाखल होईल. कारण अमेरिकेच्या प्रतिबंधामुळे भारत इराणकडून तेल आयात करत नाही. दरम्यान. या जहाजारील तेल नेमके कुणाचे, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. अद्याप भारताकडून याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.