US Warns Israel Over Iran Oil Attacks
Thick black smoke rises over Tehran after reported strikes on Iran’s energy infrastructure during the escalating Israel Iran war.Sarkarnama

Israel Iran War : मोठी बातमी! पहिल्यांदाच अमेरिका-इस्रायलमध्येच मतभेद; इराणच्या 'त्या' भागात हल्ले न करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश

US Warns Israel Over Iran Oil Attacks : इस्रायलने इराणच्या ऊर्जा क्षेत्रावर केलेल्या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये काळ्या विषारी धुराचे ढग पसरले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तसेच काही भागांमध्ये अॅसिड रेनच्या घटनाही समोर आल्या आहेत.
Published on

Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मागील बारा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दिवसेंदिवस हे युद्ध आणखी तीव्र होताना दिसत आहे. शिवाय या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत. गॅससह पेट्रोल आणि डिझेलची टंचाई अनेक देशांत निर्माण झाली आहे. त्यामुळे हे युद्ध नेमकं कधी संपणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

मात्र, इराण काही केल्या माघार घेण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. तर अमेरिका आणि इस्रायलही इराणवर तीव्र हल्ले करत आहेत. मात्र, पहिल्यांदाच अमेरिकेने इस्रायलने केलेल्या काही हल्ल्यावर नाराजी वर्तवली आहे. शिवाय इथून पुढे इराणच्या तेल आणि ऊर्जा अशा पायाभूत सुविधांवर हल्ले करू नयेत अशा सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, अमेरिकन माध्यम संस्था Axios च्या माहितीनुसार, इस्रायलने इराणच्या ऊर्जा क्षेत्रावर केलेल्या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये काळ्या विषारी धुराचे ढग पसरले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तसेच काही भागांमध्ये अॅसिड रेनच्या घटनाही समोर आल्या आहेत.

US Warns Israel Over Iran Oil Attacks
Pune SSC Paper Leak : पुण्यात परिक्षेपूर्वीच दहावीच्या 2 प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर व्हायरल; पेपर फुटीचं सोशल मीडिया रॅकेट उघडकीस आल्याने खळबळ

या परिस्थितीमुळे सामान्य इराणी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच ट्रम्प प्रशासनाने इस्रायलला इराणच्या तेल साठ्यांवर आणि ऊर्जा सुविधांवर पुढील हल्ले टाळण्याचे आवाहन केले आहेत.

तसंच दुसरीकडे इराणच्या पायाभूत सुविधांवर सतत होणारे हल्ले हल्ले इराणच्या सामान्य जनतेसाठी मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं उद्दीष्ट इराणी जनतेला त्यांच्या शासनाविरोधात उभं करायचं आहे. मात्र त्यासाठी त्यांच्या मूलभूत सुविधांचे नुकसान होऊ नये, अन्यथा ते लोकं शासनासोबत उभे राहतील ही भीती ट्रम्प यांना आहे.

US Warns Israel Over Iran Oil Attacks
Rahul Gandhi Attends Wedding : शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाला राहुल गांधींची उपस्थिती, दिले खास गिफ्ट!

तसंच हे हल्ले थांबवायला सांगण्यामागे प्रमुख तीन कारणं आहेत. त्यामध्ये, पहिलं इराणमधील जनतेचे समर्थन मिळवणे आणि त्यांना सध्याच्या शासनाविरोधात उभं करणं दुसरं भविष्यात इराणच्या तेल क्षेत्रासोबत आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करण्याची अमेरिकेची योजना आहे.

आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे इराणकडून आखाती ऊर्जा तळांवर प्रतिहल्ले होऊ शकतात. ज्यामुळे जागतिक तेल बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ट्रम्प यांनी सध्या इस्राईलला इराणच्या तेल आणि ऊर्जा अशा पायाभूत सुविधांवर हल्ले करू नयेत अशा सूचना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com