ISRO scientists rules : 'इस्त्रो'तून धक्कादायक माहिती समोर; शास्त्रज्ञांचे धडाधड राजीनामे, मोदी सरकारने उचललं मोठं पाऊल

Modi government decision on ISRO scientists : इस्रोमधील शास्त्रज्ञांच्या राजीनामे आणि स्वेच्छानिवृत्तीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या यामागची कारणे आणि अंतराळ संशोधन क्षेत्रावरील परिणाम.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

'इस्त्रो'मधील वैज्ञानिकांच्या राजीनाम्यांबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अंतराळ क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. 14 जूलै 2026 रोजी अंतरिक्ष विभागाने महत्त्वाचा आदेश जारी करत गगनयान मोहिमेसह देशाच्या महत्त्वाच्या अंतराळ प्रकल्पांवर काम करणाऱ्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जांवर थेट निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. अशा सर्व प्रस्तावांची अंतिम छाननी अंतरिक्ष विभागाच्या स्तरावर केली जाणार आहे.

या निर्णयामुळे इस्त्रोसमोर उभ्या राहिलेल्या मनुष्यबळाच्या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे. एकेकाळी देशातील सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावान तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेली ही संस्था आता अनुभवी वैज्ञानिकांच्या निर्गमनामुळे चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

Narendra Modi
Crime News : अश्लील व्हिडिओ पाठवले, नको ते बोलला..., २६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा

गेल्या काही वर्षांत खासगी अंतराळ उद्योगाचा वेगाने विस्तार झाला आहे. अनेक खासगी कंपन्या आकर्षक वेतन, जलद पदोन्नती, आधुनिक कार्यपद्धती आणि अधिक चांगले कामकाजाचे वातावरण देत असल्याने काही वैज्ञानिक त्या दिशेने वळत आहेत. याशिवाय प्रशासकीय प्रक्रिया, निर्णय घेण्यात होणारा विलंब आणि नव्या कल्पनांना पुरेसा वाव मिळत नसल्याच्या तक्रारीही काही स्तरांवरून समोर येत आहेत.

भारताच्या गगनयान मोहिमेला विशेष महत्त्व आहे. ही देशाची पहिली मानवी अंतराळ मोहीम असून तिच्या यशासाठी अत्यंत कुशल आणि अनुभवी वैज्ञानिकांची गरज आहे. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या प्रकल्पांशी संबंधित तज्ज्ञ कर्मचारी संस्था सोडत असल्यास मोहिमांच्या गतीवर आणि गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Narendra Modi
Nashik ZP News : नाशिकमध्ये मोफत गणवेश योजनेत मोठा झोल, CEO ओमकार पवारांकडून 16 मुख्याध्यापकांना नोटिसा.. कारवाईकडे लक्ष

दरम्यान, सरकारने खासगी क्षेत्राला अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी प्रोत्साहन दिले असले तरी इस्त्रोची भक्कम पायाभरणी कायम राहणे तितकेच आवश्यक मानले जाते. कारण अनेक खासगी उपक्रमांची उभारणी ही इस्त्रोने अनेक दशकांत विकसित केलेल्या तांत्रिक ज्ञान आणि संशोधनाच्या आधारावरच झाली आहे.

या आदेशावर तज्ज्ञांच्या मत आहे की, केवळ राजीनामे रोखून ही समस्या कायमची सुटणार नाही. वैज्ञानिकांच्या अपेक्षा, संशोधनासाठी आवश्यक सुविधा, वेतनरचना, करिअरच्या संधी आणि कार्यसंस्कृती यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तरुण संशोधकांना अधिक जबाबदाऱ्या आणि प्रगतीची संधी दिल्यास संस्थेतील प्रतिभावान मनुष्यबळ टिकवून ठेवणे शक्य होईल.

भारताने आगामी काळात जागतिक अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी इस्त्रोला पुन्हा एकदा वैज्ञानिकांसाठी प्रेरणादायी आणि आकर्षक संस्था बनवणे ही काळाची गरज असल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com