
New Delhi News: डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांनी देशाचे 17 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या उपराष्ट्रपतींना पद व गोपनियतेची शपथ दिली. प्रकृतीच्या कारणास्तव तडकाफडकी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देऊन खळबळ उडविणारे माजी जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांची या सोहळ्यातील उपस्थिती सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.
नवनिर्वाचित उपराष्ट्रपती डॉ.चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन यांनी परमेश्वराच्या नावाने इंग्रजीतून पद व गोपनियतेची शपथ घेतली. या पदासाठी 9 सप्टेंबरला झालेल्या त्यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला होता. या विजयानंतर डॉ. राधाकृष्णन यांनी काल (ता. 11) महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम मध्ये शपथविधी कार्यक्रम झाला.
उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर जगदीप धनखड हे या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसले. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू यांच्या शेजारी बसून ते नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्या शेजारी बसून ते स्मित हास्य करताना आणि टाळ्या वाजवताना दिसले. हे देखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर धनकड डॉ. राधाकृष्णन यांना शुभेच्छा दिल्या.
मात्र, या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अन्य कोणत्याही प्रमुख नेत्यांशी त्यांचे संभाषण झाले नाही. एवढेच नव्हे तर खुद्द धनखडही अन्य नेत्यांशी बोलले नाहीत. मात्र, राजीनाम्यानंतर धनखड कुठे आहेत, याबद्दलच्या राजकीय सवालांच्या पार्श्वभूमीवर त्यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनातील गणतंत्र हॉलमध्ये पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेते उपस्थित होते. सी. पी. राधाकृष्णन यांनी 1996 मध्ये तमिळनाडू भाजपमध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
त्यानंतर ते कोइंबतूरमधून दोनवेळा खासदार राहिले आणि भाजपच्या तमिळनाडू प्रदेशाध्यक्षपदाची देखील जबाबदारी सांभाळली. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आणि जुलै 2024 मध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. नव्या जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला.
भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी(ता.12) उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. सकाळी 10 वाजता पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्लीतील राजकीय वातावरण सज्ज झाल्याचे पाहायला मिळाले. अलीकडेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत 15 वे उपराष्ट्रपतीपद स्विकारले आहे.
शपथविधी कार्यक्रमासाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल नवी दिल्लीला दाखल झाले होते. त्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मजही, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तसेच कर्नाटक, पंजाब, झारखंड आणि मध्यप्रदेशातील राज्यपाल व मुख्यमंत्री यांचा समावेश होता. तिरुप्पूर, तामिळनाडू येथे जन्मलेले राधाकृष्णन यांनी संघ कार्यकर्त्यापासून सुरुवात करून भाजपाच्या संघटनात्मक आणि संसदीय राजकारणात आपला ठसा उमटवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.