Sharad Pawar And Thackeray Brothers Alliance
Sharad Pawar And Thackeray Brothers AllianceSarkarnama

Uddhav Thackeray News: दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा? शरद पवारांनाही सोबत घेण्यासाठी मोठ्या हालचाली

Raj Thackeray And Uddhav Thackeray : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाविरोधात एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवात राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते.
Published on

Mumbai News : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती निश्चित मानली जात आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी भेटीगाठी घेत असून दसरा मेळाव्यात युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. मुंबईत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला समवेत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मान्यता दिली आहे. तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाला आझाद मैदानावरील मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाविरोधात एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गणेशोत्सवात राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते.

त्यानंतर बुधवारी (ता. 10) उद्धव ठाकरे हे पुन्हा संजय राऊत, अनिल परब यांच्यासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जवळपास अडीच ते तीन तास चर्चा झाली.

Sharad Pawar And Thackeray Brothers Alliance
Uddhav Thackeray Raj Thackeray: ठाकरे बंधूंच्या युतीचा सर्वात जास्त फटका कोणत्या पक्षाला बसणार? धक्कादायक माहिती समोर

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा झाली. उद्धव ठाकरे हे महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांना समवेत घेण्यावर ठाम आहेत. त्याची कल्पना ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना दिली. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्यास काँग्रेसला वेगळा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही.

या पार्श्‍वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत महापालिका निवडणुकीपुरती महाविकास आघाडीतून बाजूला होण्याबाबत चर्चा झाली. मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा समवेत घेण्याबाबत बैठकीत चाचपणी झाल्याचे समजते.

Sharad Pawar And Thackeray Brothers Alliance
Supreme Court News : सुप्रीम कोर्ट राजकीय पक्षांच्या नाड्या आवळणार? पैशांची देवाणघेवाण येणार रडारवर...

शरद पवार यांच्याशी याबाबत लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे यांच्यासमवेतच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com