West Bengal news : भाजप उमेदवाराविरोधात अचानक माघार घेणाऱ्या माजी आमदाराला अटक; निकालाआधीच अंडरग्राऊंड, पोलिसांनी काढला माग

TMC leader arrested, Falta constituency : जहांगीर खान यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, खंडणी, ईव्हीएमशी छेडछाड आदी गंभीर गु्न्हे दाखल आहेत.
Jahangir Khan arrest
Jahangir Khan arrestSarkarnama
Published on
Updated on

Trinamool Congress news : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या तृणमूल काँग्रेसला आता राज्याच्या पोलिसांकडून जोरदार दणका दिला जात आहे. मागील काही दिवसांपासून अनेक नेते, पदाधिकाऱ्यांना विविध गुन्ह्यांअंतर्गत अटक करण्यात आली आहे. सोमवारी माजी आमदार जहांगीर खान यांनाही अटक करण्यात आली आहे.

जहांगीर खान हे फालटा विधानसभा मतदारसंघातून तृणमूलचे उमेदवार होते. दुसऱ्या टप्प्यात या मतदारसंघाची निवडणूक होणार होती. मात्र, मतदान प्रक्रियेत गोंधळ झाल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. फेरमतदानाच्या एक दिवस आधी जहांगीर यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर या मतदारसंघातून भाजप उमेदवाराने दणदणीत विजय मिळविला.

माघारीची घोषणा केल्यापासून जहांगीर खान अंडरग्राऊंड झाले होते. त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीचा ४ मेला निकाल लागल्यानंतरच सुमारे अर्धा डझन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी स्पेशल टास्क फोर्सने त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे माग काढत आज पहाटे नेपाळ सीमेवर अटक केली.

Jahangir Khan arrest
Court verdict news : तब्बल 10 वर्षांनी आमदारकी रद्द केली, हायकोर्टाने सुप्रीम कोर्टालाच धरलं जबाबदार; नेमकं काय घडलं?

खान यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, खंडणी, ईव्हीएमशी छेडछाड आदी गंभीर गु्न्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी कोलकाता हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. कोर्टाने फालटा विधानसभेचा निकाल लागेपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यानंतर त्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली अन् अटकेच्या भीतीने कुटुंबासह गायब झाले होते.

Jahangir Khan arrest
Ashok Gehlot news : मला काँग्रेसचं अध्यक्ष व्हायचं होतं, पण षडयंत्र झालं..! सोनिया गांधींचं नाव घेत बड्या नेत्यानं फोडला बॉम्ब

जहांगीर यांनी अटकपूर्व जामीनाची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने त्यांची विनंती अमान्य केली. त्यानंतर पोलिसांनी खान यांचा कसून शोध सुरू केला होता. खान हे तृणमूलचे सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे निवडणुकीतून त्यांनी अचानक माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. आता त्यांना अटक झाल्याने बॅनर्जी यांच्यासाठीही धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com