NDA Government : मोदी सरकारला आज राज्यसभेतही मिळाले बहुमत; कसा घडला हा चमत्कार?

Rajya Sabha Election BJP Congress : राज्यसभेच्या बारा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. सर्व जागांवर प्रत्येकी एकच अर्ज आल्याने पोटनिवडणूक बिनविरोध झाली.
Narendra Modi, Rajya Sabha
Narendra Modi, Rajya SabhaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेत सलग तीनदा बहुमताचा आकडा पार केलेल्या एनडीएला मंगळवारी राज्यसभेतही बहुमत मिळाले आहे. भाजपचे 9 सदस्य मंगळवारी राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले. भाजपच्या मित्रपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एनडीएचे राज्यसभेतील संख्याबळ 112 वर पोहचले.

देशात राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडली. प्रत्येक जागेसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने संबंधित उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. भाजपचे सर्वाधिक नऊ सदस्य राज्यसभेत गेले आहेत. तर काँग्रेसलाही एक जागा मिळाली आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक आणि राष्ट्रीय लोकमंचला एक जागा मिळाली.

Narendra Modi, Rajya Sabha
Kolkata Rape Case : भाजपनेही पुकारला राज्यव्यापी बंद; कोर्ट मान्यता देणार का?

राज्यसभेत एकूण 245 सदस्य असून सध्या 8 जागा रिक्त आहे. त्यापैकी चार जागा जम्मू आणि काश्मीरमधील तर चार नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या राज्यसभेतील सदस्यांची संख्या 237 वर पोहचली असून बहुमता आकडा 119 आहे.

एकट्या भाजपकडे राज्यसभेत 96 खासदार आहेत. तर मित्रपक्षांचे 16 सदस्य, सहा नामनिर्देशित आणि एका अपक्ष सदस्याचाही एनडीएला पाठिंबा आहे. त्यामुळे एनडीएचे राज्यसभेतील संख्याबळ 119 वर पोहचले. मागील काही वर्षांपासून भाजपकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

Narendra Modi, Rajya Sabha
Omar Abdullah : ओमर अब्दुल्लांनी शपथ मोडली; वडिलांना खोटं ठरवत विधानसभेसाठी मोठा निर्णय

राज्यसभेत विरोधकांचे संख्याबळ जास्त असल्याने अनेक सरकारी विधेयक मंजूर करण्यात अडथळे निर्माण व्हायचे. त्यापैकी काही विधेयक बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसच्या मदतीनेही मंजूर करण्यात आली. पण आता हे दोन्ही पक्ष भाजपपासून दूरावले असून मागील अधिवेशनात ते पाहायलाही मिळाले. त्यामुळे राज्यसभेत विधेयक मंजूर करणे, भाजपसाठी आव्हानात्मक बनले होते.

आता लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही भाजपचे काम सोपे होणार आहे. बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसची त्यांच्या राज्यातील सत्ता गेल्याने भाजपला अनुक्रमे ओडिशा व आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर सदस्य निवडून आणणे शक्य झाले आहे. बारा जागांवर झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com