खासदारांनी हट्ट करताच जया बच्चन यांच्या पर्समधून चॉकलेट निघाले बाहेर...

राज्यसभेचे १२ खासदार अधिवेशन काळासाठी निलंबित...
Jaya bachchan
Jaya bachchanTwitter
Published on
Updated on

नवी दिल्ली : संसदेच्या (Parliament) हिवाळी अधिवेशनाची (Winter Session) सुरूवातच वादळी ठरली आहे. मागील अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या १२ सदस्यांना या अधिवेशन काळासाठी निलंबित करून मोदी सरकारने विरोधकांना मोठा धक्का दिला. हि कारवाई मागे घ्यावी यासाठी राज्यसभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी उडत आहे.

दूसऱ्या बाजूला निलंबित खासदार सध्या संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या समोर धरणे धरून बसत आहेत. या खासदारांना भेटण्यासाठी दिवसभर काँग्रेस, तृणमूल, डावे व इतर पक्षांच्या खासदारांची सतत वर्दळ तिथे असते. मोदी सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी आपण हा गांधी मार्ग अवलंबला आहे असे या खासदारांची म्हणणे आहे. दिवसभर हे खासदार या ठिकाणी असतात. शिवसेनेचे अनिल देसाई (Anil Desai) सध्या दिल्लीत नाही त्यामुळे ते यात दिसत नाहीत.

Jaya bachchan
शिवसेनेच्या 'त्या' उपकाराची ममतांकडून परतफेड : राष्ट्रवादी-काँग्रेसचाही जीव भांड्यात

या धरणे आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, तृणमूलच्या डोला आणि सईद नासिर हुसेन, कम्युनिस्ट पक्षाचे विनय विश्व हे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी मोकळेपणाने बोलतात. आज सकाळी राज्यसभेचे कामकाज पहिल्यांदा दुपारी बारापर्यंत संस्थगित झाले. त्यानंतर या खासदारांना भेटण्यासाठी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) तिथे आल्या. सभागृहातही आक्रमकपणे मुद्दा मांडणाऱ्या बच्चन यांनी या खासदारांना, मी तुमच्या बरोबर आहे आणि तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले आहे असे सांगितले.

Jaya bachchan
दिदींच्या पंतप्रधान पदाचा रस्ता महाराष्ट्रातून? की राज्यात ताकद उभी करण्याचा प्रयत्न?

यावेळी डोला सन आणि जया बच्चन यांच्यात बंगालीतून संवाद सुरू होता. त्याचवेळी अचानक सेन यांनी त्यांना, 'दीदी चॉकलेट, चॉकलेट' असे म्हटले. त्याचा अर्थ कोणालाच कळला नाही. पण दुसऱ्याच क्षणी जया बच्चन यांनी पर्समधून चॉकलेट, सुकामेवा यांची पाकिटे काढली. धरणे धरून बसलेल्या खासदारांना त्यांनी स्वतः चॉकलेटचे वाटप केले. मुंबईत राहणाऱ्या चतुर्वेदी यांच्याकडे जाऊन बच्चन यांनी 'गोड खा, गोड गोड बोला' असे सांगताच दोघींना हसू आवरेना!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com