BJP Politics: संविधानिक पदावर विराजमान होण्यासाठी पात्रता असेलच असं नाही! भाजपचं राजकारण नेमकं काय खुणावतंय?

BJP Politics in Appointments: नुकताच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मुदतीपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यासाठी दिलेलं वैद्यकीय कारणंही अनेकांना पटलेलं नाही.
BJP Politics
BJP Politics
Published on
Updated on

BJP Politics in Appointments: केंद्रात आणि राज्यात सध्या भाजप आपल्या मित्रपक्षांसह सत्तेत आहे. दोन्हीकडं भाजपनं जवळपास ११ वर्षांचा सत्ताकाळ भोगला आहे. यामध्ये २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षे सोडली तर पुन्हा भाजप एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन सत्तेत विराजमान झाला. पण या सत्ताकाळात भाजपप्रणित सरकारनं अनेक संविधानिक पदांवर मग ती मंत्रीपदं असोत किंवा इतर संस्थांची पद असोत, त्या ठिकाणी कोणालाही अपेक्षित नसलेल्या लोकांच्या नियुक्त्या केल्या. पण विशेष बाब म्हणजे अनेकांचे कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना हटवण्यातही आलं. त्यामुळं ज्या लोकांच्या नियुक्त्या झाल्या त्या खरंच पात्रता बघून झाल्या का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. पण यामागे भाजपचं राजकारण नेमकं काय खुणावतंय? याचा आढावा घेऊयात.

BJP Politics
Operation Sindoor : "दाल में कुछ काला है"; राहुल गांधींच्या आरोपांनंतर संसदेतील '32 तास' ठरणार वादळी! PM मोदीही सभागृहात ठाण मांडणार

नुकतेच देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यासाठी आपल्याला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितल्याचं कारण त्यांनी दिलं आहे. पण त्यांचा तडकाफडकी राजीनामा आणि त्यांनी दिलेलं कारण हे न पटणार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. कारण सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणानं राजीनामा दिला. पण त्याच दिवशी सकाळी त्यांनी राज्यसभेच्या बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीच्या बैठकीला उपस्थिती लावली.

तसंच अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्यानं आपल्या अध्यक्षतेखाली राज्यसभेचं कामकाजही चालवलं. त्यांना यापूर्वी कुठल्याही गंभीर स्वरुपाचा आजार असल्याचं किंवा त्यासाठी त्यांनी काहीकाळ विश्रांती घेतल्याचीही नोंद नाही किंवा त्यांनी राजीनामा दिला त्यादिवशी त्यांची अचानक तब्येत बिघडली असंही काही नाही. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राजीनामा दिला हे त्यांच कारण पटणार नाही. पण यामुळं अद्याप अडीच वर्षांचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना या पदावरुन पायउतार व्हावं लागलं, कारण भाजपची तशी इच्छा होती. म्हणजेच या पदासाठी ते पात्र नव्हते तरीही त्यांना उमेदवारी दिली गेली अशी चर्चा आहे.

BJP Politics
Kalyan Receptionist Assault Case : रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; नेमकं काय घडलं?

त्याचबरोबर राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना, तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड जे नुकतेच उपराष्ट्रपतीपदावरुन पायउतार झाले. या सर्व राज्यपालांनी संबंधित राज्यांना आणि तिथल्या बिगर भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांना जेरीस आणल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेले निर्णय फिरवण्याचं आणि अडवण्याचं काम तिथल्या राज्यपालांनी केलं. त्याचबरोबर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळाने विधानसभेत केलेल्या कायद्यांवर सह्या न करता ते परत पाठवून देणं. तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आणि धनखड यांचा वाद सर्वश्रुत आहे. त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला होता की ममतांनी धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केलं होतं.

राज्यपालांसोबतच्या वादामुळं राज्यांमध्ये सरकारी विद्यापीठांचे कुलपती हे राज्यपाल असतात पण त्यांना हटवून मुख्यमंत्री हेच कुलपती असतील असा कायदा ममता बॅनर्जी यांना बनवावा लागला. पण तो राज्यपालांनी पास होऊ दिला नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांचा उल्लेख करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी यामुळं कोश्यारींवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. तसंच राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील त्यांनी काम करताना अनेक बाबींमध्ये सहकार्य केलं नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदार असतील किंवा नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडणुकीसाठी राज्यपालांना पत्र पाठवल्यानंतर त्यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला होता.

BJP Politics
Maharashtra NA Tax : इंग्रजांच्या काळातला NA टॅक्स रद्द केला तरी वसुली सुरुच! पुणे-मुंबईत रहिवाशांना नोटीसा; नेमका घोळ काय?

या घडामोडींमुळं केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी बिगर भाजपशासित राज्यांमध्ये नियुक्त केलेले राज्यपाल हे केवळ भाजपविरोधातील सरकारांना त्रास देण्यासाठीच नियुक्त केले होते का? असा प्रश्न उपस्थित होतो. एकूणच राज्यपाल म्हणून नियुक्त केलेल्या या लोकांची खरंच त्या पदावर विराजमान होण्याची पात्रता होती की, केवळ राजकीय फायद्यासाठीच त्यांची नियुक्ती करण्यात आली होती? असा सवाल आजही विचारला जातो. कारण या राज्यपालांना मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर किंवा त्यांची गरज संपल्यानंतर त्यांना हटवण्यात आल्याचंही दिसून आलं आहे.

BJP Politics
हाणामारी करणारा, शिव्या देणारा 'झोपडपट्टी दादा' पडळकरांचा सच्चा कार्यकर्ता? भाजप आमदार खोत यांच्याकडून ऋषी टकलेचं कौतुक

यानंतर देशाची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी झालेली शक्तीकांत दास यांची झालेली निवड. शक्तीकांत दास यांच्या निवडीवरही अनेकांनी त्यावेळी आक्षेप घेतला होता. खुद्द भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहून, शक्तीकांत दास यांची निवड अत्यंत चुकीची असल्याचं म्हटलं होतं. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी देखील शक्तीकांत दास यांच्या गव्हर्नरपदी निवडीला विरोध दर्शवला होता. दास हे अर्थतज्ज्ञ नसून एक नोकरशहा आहेत. त्यांनी सरकारच्या नोटाबंदीचं समर्थन केलं आहे, त्यामुळं आता सरकार जे सांगेल तेच ते करतील. त्यामुळं एका संविधानिक संस्थेचं अस्तित्व संपुष्टात येणार असल्याची टीका त्यावेळी सिब्बल यांनी केली होती. शक्तीकांत दास यांना विरोध होण्याच प्रमुख कारण म्हणजे ते आएएस अधिकारी आहेत. तसंच त्यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यामुळं अर्थशास्त्राची त्यांना पार्श्वभूमी नसताना त्यांना आरबीआयसारख्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यामुळं इथेही त्यांच्या गव्हर्नर म्हणून पात्रतेविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण राजकीयदृष्ट्या योग्य व्यक्ती असल्याचं सरकारचं मत होतं.

BJP Politics
Suraj Chavan News : सुरज चव्हाण यांच्यासह नऊ जणांना अटक अन् लगेच सुटका! किरकोळ मारहाणीचे कलम लावल्याचा आरोप

त्याचबरोबर राज्यातील असोत किंवा विविध विद्यापीठांमधील कुलगुरुंच्या नियुक्त्या असतील. या कुलगुरुंच्या नियुक्त्यांवर त्यावेळी काँग्रेससह अनेक शिक्षणतज्ज्ञांनी आक्षेप घेतला होता आजही घेतला जातो. कारण भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना सरकारी विद्यापीठांसारख्या शिक्षणाशीसंबंधीत महत्वाच्या संस्थांच्या प्रमुखपदी शिक्षणासंबंधीचा दांडगा पुर्वानुभव नसतानाही नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. अनेकजण तर कुलगुरुंसारख्या शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदावर बसण्याच्या पात्रतेचे नाहीत, असं अनेकांनी म्हटलं होतं.

BJP Politics
Controversial Agriculture Ministers : धनंजय मुंडेंनी पाया रचला, माणिकराव कोकाटेंनी कळस चढवला...

यानंतर २०१९ मध्ये महाराष्ट्रात आलेल्या राजकीय भूकंपानं तर देशभरात खळबळ माजवली होती. शिवसेनेतील ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी पक्ष ताब्यात घेतला. भाजपसोबत जात महाविकास आघाडीचं सरकार उलथवून लावत महायुतीचं सरकार स्थापन केलं. यावेळी भाजपकडं १०५ आमदार होते, त्यामुळं सहाजिकचं भाजपचा मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं वाटतं असतानाच दिल्लीतून भाजपच्या हायकमांडकडून वेगळीच खेळी केली गेली आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अशी स्वतः फडणवीसांनाच घोषणा करावी लागली. या एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्येच देवेंद्र फडणवीसांची पदावनती होऊन ते उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर काही महिन्यांतच अजित पवारांनी देखील मोठ्या पवारांची साथ सोडतं महायुतीच्या सरकारमध्ये सामील होणं पसंद केलं. हा महाराष्ट्रासाठी दुसरा मोठा झटका होता. त्यानंतर अनेक संविधानिक आणि राजकीय पेचप्रसंग निर्माण झाले ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या मदतीनं तडीस नेले गेले. अजूनही या सत्तानाट्याचा आणि पक्षाच्या मालकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.

BJP Politics
Ahmedabad plane crash: धक्कादायक! अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाची मोठी चूक समोर,12 कुटुंबांच्या भावनांंशी खेळ

या सर्व घडामोडी पाहता देशातच नव्हे तर राज्यातही भाजपनं राजकीय धुर्तपणे कुटनीतीचा वापर करत सत्ता राखली तसंच विरोधकांना धक्का देण्याचं किंवा त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम केलं. पण यातून पात्रता नसलेल्या व्यक्तींना केवळ काही विशेष फायद्याच्या गोष्टींसाठीच त्या पदावर बसवण्यात आलं आणि गरज संपल्यानंतर पायउतार होण्यासही भाग पाडल्याचं आजही बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com