Ajit Pawar : विधानसभेच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का; भाजपने आमदार फोडला...

BJP Kamlesh Singh Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये महाराष्ट्रासोबतच विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ranchi : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंडमधील एकमेव आमदार कमलेश सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापना झाल्यापासून कमलेश सिंह पक्षात आहेत. सध्या ते झारखंड राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आमदार सिंह आणि त्यांचे पुत्र सूर्य सिंह हे काही पदाधिकाऱ्यांसह 3 ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

Ajit Pawar
Amit Shah : अस्वस्थ खर्गे मोदींवर बरसताच अमित शाहांना आला राग; ‘ते’ शब्द लागले जिव्हारी...  

कमलेश सिंह हे 1999 मध्ये तारिक अन्वर आणि इतर नेत्यांसोबत काँग्रेसमधून शरद पवारांसोबत बाहेर पडले होते. राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक मानले जातात. त्यांनी 2005 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2009 पर्यंत ते कॅबिनेट मंत्रीही राहिले. पण 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये पुन्हा ते विजयी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर कमलेश सिंह यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. अजित पवार एनडीएमध्ये गेले आणि तेव्हापासून त्यांची भाजपशी जवळीक वाढत गेल्याचे मानले जाते. आता त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar
Rajnath Singh News : 'कटोरा घेऊन जगभर कशाला फिरताय, आमच्याकडून घ्या..., पण फक्त एकच अट'

राष्ट्रवादी एनडीएतही नाही

झारखंडमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला एनडीएतून बाहेर ठेवले आहे. एनडीएमध्ये नितीश कुमारांचा जेडीयू आणि आजसू या दोन पक्षांना घेण्यात आले आहे. या पक्षांसोबतच्या जागावाटपाचा फॉर्म्यूला जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी हा दुसरा धक्का आहे. कमलेश सिंह यांच्यासारख्या बड्या नेत्याने साथ सोडल्याने राष्ट्रवादीला राज्यात नव्या नेतृत्वाचा शोध घ्यावा लागणार आहे. कमलेश सिंह भाजपमध्ये जाताना पक्षातून किती नेते, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जाणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com