Rajnath Singh News : 'कटोरा घेऊन जगभर कशाला फिरताय, आमच्याकडून घ्या..., पण फक्त एकच अट'

Rajnath Singh on Pakistan : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिली ऑफर, जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत?
Rajnath Singh
Rajnath SinghSarkarnama
Published on
Updated on

Rajnath Singh criticizes Pakistan : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकिस्तानावर निशाणा साधला, ते म्हणाले, की पाकिस्तान आपल्या भूमीवर दहशतवादाची फॅक्टरी चालवण्यासाठी दुसऱ्या देशांना पैसे मागतो आहे.

बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेज विधानसभा मतदारसंघात एका रॅलीला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, जर पाकिस्ताने भारतबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राखले असते, तर भारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून(IMF)मागितलेल्या बेलआउट पॅकेजपेक्षा मोठे बेलआउट पॅकेज दिले असते.

राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014-15मध्ये जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी एक स्पेशल पॅकेजची घोषणा केली होती, जी आता ९० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. ही रक्कम पाकिस्ताने आयएमएफकडे मागितलेल्या बेलआउट पॅकेज पेक्षा कितीतरी जास्त आहे.

Rajnath Singh
Pakistan News : पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटला ; 'POK'मधील अत्याचाराचा 'UNHRC'मध्ये झाला 'पर्दाफाश'

राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका गाजलेल्या वक्तव्याचाही उल्लेख केला. ‘हम दोस्त बदल सकते हैं, लेकिन पड़ोसी नहीं बदल सकते.’ राजनाथ सिंह पुढे म्हणाले, मी म्हणतोय माझ्या पाकिस्तानी दोस्तांनो, आपल्यात तणावपूर्ण संबंध का आहेत?, आपण शेजारी आहोत. जर आपल्यात चांगले संबंध असते तर आम्ही आयएमएफ पेक्षाही जास्त निधी दिला असता. परंतु पाकिस्तान(Pakistan) प्रदीर्घ काळापासून पैशांचा दुरुपयोग करत आहे. पाकिस्तान आपल्या भूमीवर दहशतवादाची फॅक्टरी चालवण्यासाठी दुसऱ्या देशांना पैसे मागत आहे.

पाकिस्तानवर तब्बल १३० अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. आयएमएफने त्यांना केवळ ७ अब्ज डॉलर्सचे बेलआउट पॅकेज दिले आहे, ज्यासाठी पाकिस्तानला आयएमएफ्या काही कडक अटी देखील मान्य कराव्या लागणार आहेत.

Rajnath Singh
Haryana BJP News : हरियाणात बंडखोरांविरोधात भाजपची कडक भूमिका ; आठ नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी!

राजनाथ सिंह म्हणाले, भारताविरोधात दहशतवादाा हत्याराप्रमाणे वापर करणारा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला आहे आणि त्याचे काही विश्वासू सहकारी देखील बाजूला झाले आहेत. जेव्हापण आम्ही दहशतवादाची चौकशी केली तेव्हा आम्हाला त्यात पाकिस्तानचा समावेश आढळून आला. आम्ही पाकिस्तानाल वारंवार हे समजावण्याचा प्रयत्न केला की, त्यांनी दहशतवादी शिबीरं बंद केली पाहिजेत, परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com