Amit Shah : अस्वस्थ खर्गे मोदींवर बरसताच अमित शाहांना आला राग; ‘ते’ शब्द लागले जिव्हारी...  

Mallikarjun Kharge Narendra Modi BJP Congress : मल्लिकार्जून खर्गे यांनी रविवारी जम्मूतील एका प्रचारसभेत मोदींवर टीका केली होती.
Amit Shah, Mallikarjun Kharge
Amit Shah, Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची रविवारी जम्मूतील एका प्रचारसभेत अचानक तब्बेत बिघडली. त्यानंतर बोलताना मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधताना त्यांना सत्तेवरून हटववेपर्यंत आपण मरणार नाही, असे विधान केले होते.

खर्गे यांच्या या विधानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चांगलेच संतापले आहेत. काँग्रेसच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याविषयी किती द्वेष आणि भीती आहे, हेच या विधानावरून दिसत असल्याची टीका शाह यांनी केली आहे. काँग्रेस नेते सातत्याने त्यांच्याविषयीच विचार करत असतात, असेही ते म्हणाले.

Amit Shah, Mallikarjun Kharge
Rajnath Singh News : 'कटोरा घेऊन जगभर कशाला फिरताय, आमच्याकडून घ्या..., पण फक्त एकच अट'

खर्गे यांच्या आरोग्याविषयी पंतप्रधानांसह मी आणि आम्ही सर्वचजण प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचे आरोग्य चांगले राहावे, असेही शाह यांनी म्हटले आहे. दरम्यान, रविवारी खर्गे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांना फोन केला होता.

पंतप्रधान मोदींनी खर्गेंशी पोनवरून संवाद साधत तब्बेतची माहिती घेतली. त्यावरून अमित शाहांनी खर्गे यांच्यावर पलटवार केला आहे. रविवारी जम्मूतील एका प्रचारसभेत भाषण सुरू असतानाच खर्गे यांची तब्बेत अचानक बिघडली. बोलत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. स्टेजवरील पदाधिकारी व नेत्यांनी त्यांना आधार देत खुर्चीवर बसवले.

Amit Shah, Mallikarjun Kharge
Chirag Paswan News : चिराग पासवान यांचा पक्ष झारखंड विधानसभा लढवणार ; आघाडी की स्वबळ निर्णय लवकरच!

काही मिनिटे आराम केल्यानंतर खर्गेंनी पुन्हा काहीवेळ भाषण केले. यावेळी त्यांना इतरांचा आधार घ्यावा लागला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, मी इतक्या लवकर मरणार नाही. मोदींना सत्तेवरून हटवेपर्यंत मी जिवंत असेन, असे खर्गे यांनी म्हटले होते.

पंतप्रधानांनी मागील दहा वर्षात देशातील युवकांसाठी काहीही केले नाही. मागील दहा वर्षात तुमचा विकास परत न आणू शकलेल्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का, असा सवाल खर्गेंनी उपस्थितांना केला. तुमच्यासमोर कुणी भाजपचा नेता आला तर त्यांनी विकास आणला की नाही, हे विचारा, असे आवाहनही खर्गेंनी यावेळी केली होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com