Assembly Election : भाजपच्या ‘नॅरेटिव्ह’विरोधात काँग्रेसचे मुख्यमंत्री मैदानात; म्हणाले, मोदींनी खोटे बोलणे थांबवले नाही तर...

PM Narendra Modi BJP Congress Revanth Reddy Sukvinder Singh Sukhu DK Shivakumar : रेवंथ रेड्डी, सुखविंदर सिंह सुक्खू, डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी मुंबईत एकत्रित पत्रकार परिषद घेतली.
Congress, Narendra Modi
Congress, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : काँग्रेसशासित राज्यांतील आर्थिक स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे नेते गंभीर आरोप करत आहेत. काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे नॅरेटिव्ह भाजपकडून सेट केले जात आहे. त्या नॅरेटिव्हविरोधात काँग्रेसच्या तीन राज्यांतील मुख्यमंत्री मैदानात उतरवले आहेत.

प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार महाराष्ट्रात आले आहेत. शुक्रवारी त्यांनी मुंबईत एकत्रित पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. (Mahavikas Aghadi)

Congress, Narendra Modi
BJP MLA to officers : अधिकारी पैसे घेतात, त्यांना मारेन! भाजपच्या महिला आमदाराची मंत्र्यासमोरच धमकी

रेवंथ रेड्डी म्हणाले, मागील काही दिवसांपासून भाजप आणि मित्रपक्षांकडून तेलंगणाविषयी चुकीची माहिती दिली जात आहे. आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. पण, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणाविषयी आणि राज्याच्या धोरणांविषयी खोटे बोलण्यास सुरूवात केली.

पंतप्रधान मोदींनी खोटे बोलणे थांबविले नाही तर आम्हीही खरे बोलणे थांबवणार नाही, असे रेड्डी म्हणाले. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. तीन काळे कृषी कायदे आणून मोदींना शेतकऱ्यांना अदानी आणि अंबांनींच्या हातात द्यायचे होते, अशी टीकाही रेड्डींनी केली. महाराष्ट्रात बोलण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही म्हणून दुसऱ्या राज्यांकडे बोट दाखवले जात असल्याचे ते म्हणाले.

Congress, Narendra Modi
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील भाषणावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आव्हान; म्हणाले, या फिरून बघा, पडताळणी करा!

शिवकुमार यांनी आपण दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केल्याचा दावा यावेळी केला. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यापैकी एकही योजना मनमोहन सिंग पंतप्रधान असेपर्यंत बंद केलेली नाही. आम्ही मतांसाठी योजना सुरू करत नाही, लोकांचा विकास हेच आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेश 2027 मध्ये देशातील सर्वाधिक समृध्द राज्य असेल तर 2032 मध्ये सर्वात श्रीमंत राज्य बनेल, असा विश्वास सुक्खू यांनी व्यक्त केला. आम्ही धोरणात्मक परिवर्तन आणले आहे. राज्यातील शेवटच्या स्तरातील लोकांचा विचार करून धोरणे राबवली आहेत, असेही सुक्खू म्हणाले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com