Hemant Soren : हेमंत सोरेन यांनी हुकमी एक्का काढला बाहेर! चंपई सोरेन यांच्या भाजप प्रवेशआधीच मोठी खेळी

Champai Soren Ramdas Soren JMM : चंपई सोरेन यांनी हेमंत सोरेन यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
Hemant Soren, Champai Soren
Hemant Soren, Champai SorenSarkarnama
Published on
Updated on

Ranchi : झारखंडमध्ये ‘कोल्हान टायगर’ म्हणून ओळख असलेल्या चंपई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाला रामराम ठोकला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पण चंपई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी मोठी खेळी खेळली आहे.

दिग्गज आदिवासी नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधी जेएमएमवर हे संकट ओढवल्याची चर्चा आहे. प्रामुख्याने कोल्हानसारख्या सर्वात मोठ्या आदिवासी भागात पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

Hemant Soren, Champai Soren
Narendra Modi : सरस्वती बुध्दी वाटत असताना ते सर्वात पुढे होते! पंतप्रधान मोदी कुणाला म्हणाले विद्वान?

हेमंत सोरेन यांनी कोल्हान भागातील राजकीय हानी भरून काढण्यासाठी एक सूचक संदेश दिला आहे. त्यांनी चंपई सोरेन यांना टक्कर देऊ शकेल अशा नेत्याला सोबत घेतले आहे. या भागातील घाटशिला मतदारसंघातील आमदार रामदास सोरेन यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

रामदास सोरेन यांनी सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांची चंपई सोरेन यांच्याजागी वर्णी लागली आहे. हे दोघेही कोल्हान भागात वर्चस्व असलेले नेते आहेत. तसेच रामदास सोरेन यांना चंपई सोरेन यांचे विश्वासू सहकारीही मानले जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.

Hemant Soren, Champai Soren
Rahul Gandhi : काँग्रेसचा राहुल गांधी नव्हे तर ‘या’ नेत्यावर सर्वाधिक खर्च; तरीही निवडणुकीत झाला पराभव

चंपई सोरेन भाजपमध्ये गेल्याने पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी रामदास सोरेन यांन मंत्री केल्याची चर्चा आहे. तसेच कोल्हान भागातील संथाल या आदिवासी समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हान भागात पक्षाला मजबूत स्थितीत ठेवण्याचेच त्यांचा उद्देश असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. चंपई सोरेनही संथाल समाजातील आहेत.

2020 च्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमला कोल्हान भागातील 14 पैकी 11 जागांवर विजय मिळला होता. तर दोन जागा आघाडीतील काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यामुळे चंपई यांच्या जाण्याने पक्षाला फटका बसल्यास बहुमत मिळवण्यातही अडचण येऊ शकते. तर दुसरीकडे भाजपला त्याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे हेमंत सोरेन यांनी रामदास तडस यांच्यासारख्या नेत्याला मंत्रिपद देत भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाचे संस्थापक शिबू सोरेन यांच्यासोबत पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा हातभार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com