

Arvind Kejriwal News : दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा या दिल्ली दारु घोटाळा केसमधून बाहेर पडल्या आहेत. या केसच्या सुनावणी दरम्यान 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी स्वर्णकांता या न्याय करतील का? त्या आरएसएसच्या कार्यक्रमाला चार वेळा हजर राहिल्या होत्या, असा आक्षेप घेतला होता.
केजरीवाल यांनी स्वर्णकांता यांच्या तटस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच त्या विशिष्ट विचारांनी प्रेरित आहेत. त्यामुळे त्या आपल्याला न्याय देतील का? या विषयी आपल्या मनात शंका असल्याचे वक्तव्य त्यांच्यासमोर केजरीवाल यानी सुनावणी दरम्यान केले होते. त्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला होता.
या प्रकरणाची संपूर्ण देशभर चर्चा सुरू होती. अखेर स्वर्णकांता यांनी 'आप'च्या नेत्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करत या केसमधून बाहेर पडण्याचा निर्णया घेतला.
अवमान याचिका न्यायाधीश दाखल करत असतो त्या खटल्याशी त्यांनी संबंध ठेवणे योग्य नसते. त्यामुळे आपण या खटल्यातून वेगळे होत आहोत, असा युक्तीवाद न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा करत स्वतःला या खटल्यापासून वेगळे केले.
स्वर्णकांता या खटल्याच्या सुनावणीमधून बाहेर पडल्यानंतर गुरुवारी रात्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सत्याचा विजय झाला. गांधीजींच्या सत्याग्रहाचा पुन्हा एकदा विजय झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.