
Emergency in India : आणीबाणीच्या मुद्द्यावरून बुधवारी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. भाजप नेत्यांकडून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरकारवर आसूड ओढण्यात आले. तर काँग्रेसकडून मागील 11 वर्षांत देशात अघोषित आणीबाणी असल्याचा पलटवार केला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही आणीबाणीवरून सोशल मीडियात पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे. त्याला काँग्रेसच्या महिला नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे.
ज्योतिरादित्य शिंदे हे सध्या भाजपमध्ये असले तरी आधी ते काँग्रेसमध्ये होते. त्यांचे वडीलही अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते. पण पक्षांतर्गत गटबाजीनंतर ते काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनीही आणीबाणीचा निषेध करणारी पोस्ट सोशल मीडियात केली आहे.
शिंदे यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे की, 25 जून 1975 हा भारतीय लोकशाहीचा काळा दिवस होता. काँग्रेसच्या हुकुमशाही मानसिकतेने देशावर जबरदस्तीने आणीबाणी थोपवली होती. दरवर्षी हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून त्याची आठवण करतो. जेणेकरून लोकशाहीचे रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा विसर पडणार नाही.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या पोस्टवर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या राष्ट्रीय प्रमुख सुप्रिया श्रीनेत चांगल्याच भडकल्या. त्यांनी शिंदे यांच्या या पोस्टला प्रत्युत्तर देताना थेट त्यांची लाज काढली आहे. निर्लज्जपणाचीही मर्यादा असते, असे श्रीनेत शिंदे यांना उद्देशून म्हणाल्या आहेत.
काँग्रेसकडून तुम्ही किती वेळा खासदार होता, किती वेळा मंत्री बनला, असे सवाल करत सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या आहेत की, माझे संस्कार मला या गोष्टीची परवानगी देत नाहीत, अन्यथा तुमच्या वडील काँग्रेसमध्ये होते, त्यावर काही प्रश्न नक्कीच विचारले असते. निर्लज्जपणाचीही मर्यादा असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.