Shashi Tharoor : झेप घेण्यासाठी परवानगी मागू नका..! थरूर यांचा संयम संपला, खर्गेंचे ते शब्द जिव्हारी

Mallikarjun Kharge’s Indirect Message: Congress Leadership Dynamics : मल्लिकार्जून खर्गे यांनी आज दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी शशी थरूर यांनाच उद्देशून होते.
Shashi Tharoor posts a cryptic message on social media following Congress President Mallikarjun Kharge’s indirect remarks about party discipline.
Shashi Tharoor posts a cryptic message on social media following Congress President Mallikarjun Kharge’s indirect remarks about party discipline. Sarkarnama
Published on
Updated on

Shashi Tharoor’s Bold Social Media Statement : मागील काही महिन्यांपासून काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि इतर नेत्यांमध्ये शीतयुध्द सुरू असल्याचे वारंवार जाणवत होते. आता त्यांचा संयम संपल्याचे सध्याच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. थरूर यांची सोशल मीडियातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट करण्यामागे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हेच कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

मल्लिकार्जून खर्गे यांनी आज दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी थरूर यांनाच उद्देशून होते. थरूर यांच्याकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले जात असल्याने पक्षातील नेत्यांकडून त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाले खर्गे?

थरूर यांच्या विधानांविषयी बोलताना खर्गे म्हणाले, शशी थरूर यांची भाषा खूप चांगली आहे, म्हणून त्यांना काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये घेतले आहे. पण जेव्हा मी गुलबर्गामध्ये म्हटले की, आम्ही एका सुरूवात बोलत आहोत, देशासाठी उभे आहोत, ऑपरेशन सिंदूरमध्ये एकजूट होतो. तेव्हा काही लोक म्हणतात, देश नंतर. त्यावर आता आम्ही काय करू?

Shashi Tharoor posts a cryptic message on social media following Congress President Mallikarjun Kharge’s indirect remarks about party discipline.
कॉर्पोरेट ग्लॅमर सोडून राजकारणात; आता आमदारकीची लॉटरी...

थरूर यांचे प्रत्युत्तर

खर्गे यांच्या या विधानानंतर थरूर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट म्हणजे खर्गे यांना प्रत्युत्तर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. थरूर यांनी पहिल्यांदाच थेट राष्ट्रीय अध्यक्षांच्या विधानावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये थरूर यांनी एका फांदीवर चिमणी बसल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिले आहे की, झेप घेण्यासाठी कुणाची परवानगी घेऊ नका. पंख तुमचे आहेत आणि आकाश कुणाचेही नाही.

Shashi Tharoor posts a cryptic message on social media following Congress President Mallikarjun Kharge’s indirect remarks about party discipline.
Ajit Pawar Victory : अजितदादांनी गुलाल उधळला..! माळेगाव कारखान्यातील ऐतिहासिक विजयानंतर टार्गेट ठरलं...

थरूर यांचा हा संदेश पक्षाविषयीचे नाराजी सूर असल्याचे मानले जात आहे. पक्षाकडून थरूर यांच्या मोदींविषयीच्या भूमिकेविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असताना ही पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा बनली आहे. थरूर यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा तर दिला नाही, असे तर्कवितर्क लढविले जात आहेत. थरूर यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख देशाची प्रमुख संपत्ती असा केला होता. त्यानंतर खर्गे यांचे विधान आणि थरूर यांची पोस्ट, यामुळे पक्षात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com