Mamata Banarjee: ममता बॅनर्जींना आणखी एक झटका! 'या' निकटवर्तीयानंही दिला अचानक राजीनामा; म्हटलं, आता जबाबदाऱ्या...

Mamata Benarjee: तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमधील सत्ता गेल्यानंतर आता त्यांना आणि त्यांच्या पक्षाला ग्रहण लागल्यासारखी स्थिती आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkarnama
Published on
Updated on

Mamata Banarjee: तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमधील सत्ता गेल्यानंतर आता त्यांना आणि त्यांच्या पक्षाला ग्रहण लागल्यासारखी स्थिती आहे. नुकतीच त्यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून त्यांचे ८० पैकी ६० आमदार हे ममता बॅनर्जींना सोडून बंडखोर गटाकडं गेले आहेत. त्यातच त्यांचे खासदारही या बंडखोर गटाकडं जाणार असल्याची स्थिती आहे. आता त्यात आणि एक भर पडली आहे, ती म्हणजे त्यांच्या एका अत्यंत निकटवर्तीय नेत्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं ममतांना आणखी एक झटका बसला आहे.

Mamata Banerjee
Farmer Loan Waiver: सरकारची कर्जमाफी योजना फसवी! केवळ दोन-तीन टक्के शेतकर्‍यांनाच मिळणार लाभ?

तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते फिरहाद हकीम असं या नेत्याचं नाव असून ते कोलकात्याचे महापौर आहेत. त्यांनी ३ जून २०२६ रोजी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे, राजीनामा देताना त्यांनी यामागचं कारणंही सांगितलं. आपण आता ही जबाबदारी पहिल्यासारखी पेलू शकत नाही, योग्य प्रकारे पदाला न्याय देऊ शकत नाही त्यामुळं आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अचानक दिला राजीनामा

राजीनाम्यानंतर हकीम यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, मी माझ्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे आभार व्यक्त करतो. डिसेंबर २०१८ मध्ये सोवन चॅटर्जी यांच्या अचानक राजीनाम्यानंतर मला कोलकात्याच्या नगरसेवकांद्वारे महापौर म्हणून निवडलं गेलं. मी संपूर्ण इमानदारीनं आपली जबाबदारी निभावली. पण आता मी ही जबाबदारी पार पाडण्यात मी सक्षम राहिलेलो नाही. कारण महापौरपद ही केवळ एक खुर्ची नव्हे तर मोठी जबाबदारी आहे.

Mamata Banerjee
Abhijeet Dipke: कॉकरोच पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके उद्या भारतात येणार; तत्पूर्वीच त्याच्या कुटंबानं सोडलं घर

राजीनाम्यामागचं खरं कारण आलं समोर

बुधवारी फिरहाद हकीम यांच्या महापौरपदाच्या राजीनाम्यानंतर तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांनी सांगितलं की, हकीम हे कोलकात्याच्या महापौरपदावरुन सन्मानजनक निवृत्ती हवी होती. कारण राज्यात नव्यानं स्थापन झालेलं भाजपचं सरकार आता महापालिकेला निष्क्रीय करत आहे. त्यामुळं त्यांनी या पदावरुन दूर होण्यासाठी आधी ममता बॅनर्जी यांच्याकडं परवानगी मागितली त्यानंतर त्यांना ममतांनी परवानगी दिली.

कोलकात्याचे पहिले मुस्लिम महापौर

आमदार हकीम नोव्हेंबर २०१८ पासून केएमसीचे (कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन) महापौर म्हणून काम करत होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजेच १९४७ नंतर केएमसीचे आजवर मुस्लिमांव्यतिरिक्त इतर समाजाचे महापौर झाले आहेत, पण हकीम यांना कोलकाता शहराच्या पहिल्या मुस्लिम महापौर होण्याचा मान मिळाला. दरम्यान, हकीम यांच्या राजीनाम्यानंतर आता कोलकात्याचा पुढचा महापौर कोण होणार? याची चर्चा सुरु झाली आहे. कोलकाता महानगरपालिकेवर २०१० पासून तृणमूलची सत्ता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com