शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर मिळाला पहिला खासदार; कलाबेन डेलकर विजयी

उद्धव ठाकरेंचे हे पंतप्रधान बनण्याच्या वाटेतील मोठे पाऊल आहे.
Kala ben Delkar
Kala ben DelkarSarkarnama
Published on
Updated on

दादरा-नगर हवेली : शिवसेनाला महाराष्ट्राबाहेर आपला पहिला खासदार मिळाला आहे. दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेशामधील (Dadra Nagar Haveli Union Territory) पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर तब्बल ५१ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. आज सकाळी अगदी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ मत मिळाली. तर भाजपचे उमेदवार महेशभाई गावित यांना ६६ हजार १५७ मत मिळाली आहेत. सोबतच काँग्रेसचे उमेदवार महेशभाई धोडी यांचाही इथं पराभव झाला आहे.

संजय राऊतांनी मानले मतदारांचे आभार :

शिवसेनेच्या या विजयाच्या पार्श्वभुमीवर पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेनेचे हे महाराष्ट्राबाहेर दमदार पाऊल आहे. आम्ही अनेक वर्ष यासाठी प्रयत्न करत होतो. ती संधी आम्हाला दादरा नगर हवेलीमध्ये प्राप्त झाली. त्याबद्दल त्यांनी तिथल्या मतदारांचे आभारही मानले आहेत. तसेच आजूबाजूच्या दमन, दक्षिण गुजरातमध्ये मतदारसंघांमध्येही काम सुरु करत असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

Kala ben Delkar
फडणवीस दादरा नगर हवेलीत जाऊन कडाडले...महाराष्ट्रातील खंडणीखोर सरकार तुम्हाला हवयं का?

या सोबतच राऊत यांनी सुचक ट्विटही केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचे पहिले पाऊल. उद्धव ठाकरेंचे हे दिल्लीच्या वाटेतील मोठे पाऊल आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंचा हातात हात घेतलेला फोटो टाकत #Chalodelhi हा सुचक हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळेच आता संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पंतप्रधान बनवण्याचे संकेत या फोटोतुन दिल्याचे दिसत आहे.

राज्याबाहेर पहिला खासदार करण्याच्या निर्धाराने शिवसेनेने देखील ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील, (Gulabrao Patil) शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापासून अनेक खासदारांवर तेथील प्रचाराची धुरा सोपविण्यात आली होती. या विजयासह लोकसभेत शिवसेनेचे आता १९ खासदार झाले आहेत.

Kala ben Delkar
धक्कादायक : खासदार मोहनभाई डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या

मोहन डेलकर यांच्या निधनाने जागा रिक्त झाली होती :

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेनजीक असलेल्या दादरा-नगर हवेली या मतदारसंघाचे सातवेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर यांनी यावर्षी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मरीन ड्राईव्हवरील एका हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफूल्ल खेडा पटेल यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद करून ठेवले होते. त्याआधारे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्यांच्या निधनानंतर तिथं सध्या पोटनिवडणूक जाहिर झाली होती.

१९८९ ला डेलकर हे प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर १९९१ आणि १९९६ ला ते कॉंग्रेसचे खासदार होते. तर, १९९८, १९९९ आणि २००४ ला भाजपकडून खासदार झाले. २००९ ला त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ ला मात्र, कॉंग्रेसकडून न लढता पुन्हा अपक्ष म्हणून लढले व निवडूनही आले होते. त्यांच्या निधनानंतर मागच्या महिन्यात ७ तारखेला स्व. डेलकरांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी मुंबईत येऊन मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच कलाबेन यांना दादरा-नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com