Kangana Ranaut Slap-Gate Case Update : कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या महिला जवानाचं निलंबन मागे, पण सेवेत रुजू होताच...

Kangana Ranaut News : सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने चंदीगड विमानतळावर अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतच्या कानाखाली लगावली होती. यानंतर तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama

Kangana Ranaut News : हिमाचल प्रदेशच्या मंडी या लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कंगना रनौत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर पोहोचली होती.यावेळी 'चेक इन काऊंटर'वर तिची सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरसोबत शा‍ब्दिक चकमक उडाली.

यावेळी सीआयएसएफ जवान कौरने थेट अभिनेत्री कंगना रनौतच्या कानाखाली लगावली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने चंदीगड विमानतळावर अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) कानाखाली लगावली होती. यानंतर तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, आता तिला पुन्हा सेवेत घेण्यात आलं आहे. मात्र, सेवेते पुन्हा रुजू केल्यानंतर कौरची थेट बंगळुरुला बदली करण्यात आली आहे. तिच्या पतीचीही बदली करण्यात आली आहे.

शेतकरी आंदोलकांबाबत कंगना रनौतने आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचा राग मनात धरुन कुलविंदर कौरने कंगनाच्या कानाखाली मारल्याची माहिती समोर आली होती.याबाबत सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने (Kulvinder Kaur) व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपली बाजू मांडली होती. त्यात तिने'कंगनाने 100 रुपये घेऊन महिला शेतकरी आंदोलनात बसल्या होत्या असं म्हटलं होतं. त्यावेळी माझी आईही आंदोलनात सहभागी होती असंही कौरने त्या व्हिडीओत सांगितलं होतं.

Kangana Ranaut
Pankaja Munde : महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण? पंकजा मुंडेंची आता सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या...

कंगना रनौतने देखील या धक्कादायक प्रकारानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली होती. याचवेळी तिने मी सुरक्षित आहे. मी पूर्णपणे ठीक आहे. सुरक्षा तपासणीच्या वेळी ही घटना घडली. महिला सुरक्षारक्षकाने मी तेथून बाहेर पडण्याची वाट पाहिली. नंतर तिने बाजूने येऊन माझ्यावर हात उचलल्याची माहिती दिली होती.

यानंतर कंगनाने तिला का मारलं असा प्रश्न केला. यावर संबंधित महिलेने, मी शेतकऱ्यांचे समर्थन करते. असं उत्तर दिल्याचेही व्हिडीओत कंगना म्हणाली. पंजाबमधील वाढत्या दहशतवादाची मला चिंता आहे. ते आपण कसं हाताळणार आहोत? असा सवालही केला होता.

Kangana Ranaut
Aditya Thackeray News : 'महाराष्ट्रात टीम इंडियाच्या स्वागताला गुजरातची बस कशासाठी?' ; आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com