Kangana Ranaut News : ...तेव्हा कंगना रनौतला 'या' व्यक्तीने केली होती पिस्तूल ऑफर; स्वत:च सांगितला किस्सा!

Loksabha Election 2024 : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने कंगना रनौत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama

Loksabha Polls : भाजपने अभिनेत्री कंगना रनौत यांना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता कंगना यांनीही धूमधडाक्यात प्रचार सुरू केला आहे. आपल्या निर्भीड आणि स्पष्टवक्तेपणामुळे कंगना रनौत कायमच चर्चेत राहिलेल्या आहेत. मग ते बॉलिवूड असो किंवा राजकारण. मुंबईत शिवसेनेसोबतचा वाद देशभर गाजला होता. याच पार्श्वभूमीवर कंगना यांनी एक गुपितही उघड केलं आहे.

शिवसेनेसोबत वाद झाल्यानंतर त्या काळात त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांच्या वडिलांनी त्यांना स्वसंरक्षणासाठी पिस्तूल आणून देऊ का? असं विचारल्याचा किस्सा त्यांनी प्रचारादरम्यानच सांगितला. कारण शिवसेनेसोबत (Shivsena) वाद झाल्यानंतर त्यांना धमक्या येत होत्या, याबाबत त्यांच्या वडिलांना समजलं होतं.

त्यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे आणि ते मलाही एक पिस्तूल घेऊन देणार होते. मात्र, त्यावेळी कंगना यांनी त्यांच्या वडिलांचं बोलणं गंमतीने घेतलं आणि नकार दिला होता, असं कंगना यांनी सांगितलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kangana Ranaut
Lok Sabha Election 2024 : सोनिया गांधींच्या जावयाचे गुडघ्याला बाशिंग; निवडणूक लढण्याचे संकेत

कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्या घरी सर्वजण उच्चपदस्थ आहेत. आजोबा आयएएस रँक अधिकारी, पणजोबा आमदार होते, काका डॉक्टर तर काहीजण अधिकारी पदावर आहेत. एवढच नाहीतर कंगना यांनाही प्रशासकीय अधिकारी अथवा डॉक्टर बनण्याचा आग्रह कुटुंबीयांकडून झाला होता. मात्र, त्यांचा ओढा अभिनय क्षेत्राकडे असल्याने त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करून यश संपादन केलं.

कंगना रनौत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कट्टर समर्थक आहेत. गेल्या वर्षी कंगना रनौत यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे संकेत दिले होते. भगवान कृष्णाने आशीर्वाद दिला तर आगामी लोकसभा निवडणूक लढवेल, असे त्यांनी म्हणत त्यांनी खासदार होण्याची इच्छ व्यक्त केली होती. आता भाजपने त्यांना हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभेसाठी संधी दिली आहे.

Kangana Ranaut
Lok Sabha Election 2024 : चिराग पासवानांसह ‘एनडीए’ला धक्का; एकाचवेळी 22 नेत्यांनी सोडली साथ

दरम्यान, 2019 मध्ये भाजप-शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र, सत्ता स्थापन करताना शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. त्यास भाजपने (BJP) नकार दिल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत (Congress) महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर अभिनेत्री कंगना रनौतने सडकून टीका केली होती. मुंबईत सुरक्षित वाटत नसून हा एक पाकिस्तानचा भाग असल्याचे वादग्रस्त विधान केले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com