Lok Sabha Election 2024 : चिराग पासवानांसह ‘एनडीए’ला धक्का; एकाचवेळी 22 नेत्यांनी सोडली साथ

Chirag Paswan News : चिराग पासवान यांनी लोकसभेची तिकीटं विकल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. पक्षाबाहेरील लोकांना उमेदवारी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Chirag Paswan, Amit Shah, Nitish Kumar
Chirag Paswan, Amit Shah, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar Political News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचाराचा धुरळा उडत असतानाच बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांच्यासह एनडीए मोठा दणका बसला आहे. एकाचवेळी 22 नेत्यांनी चिराग यांची साथ सोडली आहे. या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केल्याने एनडीएची डोकेदुखी वाढणार आहे. तर आघाडीला काही दिलासा मिळणार आहे.

बिहारमधील (Bihar) लोकसभेच्या 40 जागांपैकी चिराग यांच्या पक्षाच्या वाट्याला पाच जागा आल्या आहेत. पाचही जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या उमेदवारांनी प्रचारही सुरू केलेला असताना पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली आहे. (Latest Political News)

Chirag Paswan, Amit Shah, Nitish Kumar
Lok Sabha Election 2024 : भाजपमध्ये बंडखोरी; बड्या नेत्याचं थेट येडियुरप्पांना आव्हान

चिराग (Chirag Paswan) यांनी लोकसभेची तिकीटे विकल्याचा आरोप करत पक्षातील 22 नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामध्ये माजी मंत्री रेणु कुशवाह, माजी आमदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश कुमार, राज्य सचिव रविंद्र सिंग, राज्य सरचिटणीस राजेश डांगा, अजय कुशावाह, संजय सिंह आदी नेत्यांचा समावेश आहे.

याविषयी बोलताना रेणु कुशवाह म्हणाल्या, पक्षाबाहेरील लोकांना लोकसभेची तिकीटे देण्याऐवजी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळायला हवी. पण बाहेरली लोकांनाच तिकीटे मिळाली. त्यामुळे क्षमता असलेले आणि पक्षासाठी झटणाऱ्या लोकांना त्यांचा मान मिळाला नाही. आम्ही तुम्हाला नेते बनविणारे कामगार आहोत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चिराग यांची साथ सोडलेले नेते इंडिया आघाडीला (India Alliance) पाठिंबा देणार असल्याचे सतिश कुमार यांनी जाहीर केले. बिहारमधील जनतेशी चिराग यांनी गद्दारी केल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षातील कार्यकर्ते ज्यांच्या विरोधात होते, अशा बाहेरील लोकांना उमेदवारी देण्यात आली. पक्ष प्रमुखांनी कार्यकर्त्यांना भावना चिरडल्याचे कुमार यांनी सांगितले.

Chirag Paswan, Amit Shah, Nitish Kumar
Shashi Tharoor News : पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? काँग्रेस नेते शशी थरूर म्हणतात...

देश वाचवण्यासाठी आता आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे कुमार म्हणाले. रविंद्र सिंह यांनी चिराग पासवान यांच्यावर गंभीर आरोप केले. बिहारमधील लोकांसोबत चिराग यांनी भावनिक खेळ खेळला. आमच्या परिश्रमामुळे पक्षाला लोकसभेच्या पाच जागा मिळाल्या पण त्यांनी त्या इतरांना विकल्या, असा आरोप सिंह यांनी केला.

दरम्यान, बिहारमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात भाजप, जेडीयू आणि चिराग पासवान यांच्या पक्षाची आघाडी आहे. भाजपला 17 तर जेडीयूला 16 जागा मिळाल्या आहेत. चिराग यांना पाच आणि इतर दोन जागा अन्य मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत.

Chirag Paswan, Amit Shah, Nitish Kumar
Congress News : काँग्रेसची ढाल असलेल्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी; गंभीर आरोप करत म्हणाले...         

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com