Raj Thackeray News : सावरकरांनी हिंदू धर्मातील त्रुटींवर टीका करताना कधी मागेपुढे पाहिलं नाही..! राज ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांना झोडपले

Raj Thackeray on Savarkar criticism: आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरु आहे, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
Raj Thackeray comments on Savarkar ideology
Raj Thackeray comments on Savarkar ideologySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray slams ruling government: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांना झोडपून काढले. तसेच सावकरांवर टीका करणाऱ्यांचाही समाचार घेतला.

राज ठाकरेंनी सोशल मीडियात पोस्ट करत सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन केले. सावरकरांच्या विचारांची मांडणी करत त्यांनी प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली, अन्यथा तो उपचार ठरेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

काय म्हटले आहे राज ठाकरेंनी?

सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत.

सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? त्यांना समजले असतील का याची शंकाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का?, असा सवाल राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणं मान्य नव्हतं. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे, असं त्यांचं ठाम मत होतं. हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच, ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हॉट्सअप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर काही न तपासता किंवा साधा विचार पण न करता खरं मानण्याची चढाओढ लागली आहे.

याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागल्याचं दिसत आहे. आणि आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्वल होती हे न बघता उत्सव, डीजे याच्यात आपल्याला गुंतवून ठेवलं जात आहे, अशी नाराजी ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

Raj Thackeray comments on Savarkar ideology
Rahul Gandhi news : राहुल गांधींकडून 'करेक्ट कार्यक्रम'; 'त्या' नेत्यांना दाखवून दिली ताकद

सावरकर हे प्रखर हिंदू धर्मभिमानी होते पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरु आहे. जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरु आहे.

आणि याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत. उठता बसता सावकरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या. पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे?, अशी टीका राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

Raj Thackeray comments on Savarkar ideology
महिला IPS अधिकाऱ्याचं 'ते' खळखळून हसणं व्हायरल; काही मिनिटांतच अडकल्या वादात

मी गेल्या २ महिन्यांत दोन वेळेस भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण करून सांगतोय. याचं कारण आपण कोण होतो हेच आपण विसरलो तर पुढे कुठे जायचं याचा मार्ग आखणार तरी कसे आहोत? आणि यासाठी जर आपण सत्तेला आसुलेले राजकारणी आणि व्हॉट्सअप विद्यापीठातील खोटी नरेटिव्ह यावर अवलंबून राहणार असू तर महाराष्ट्राचं कठीण आहे. आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतलं जे उत्तम आहे ते घेणं, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं हे करणं म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली. अन्यथा तो उपचार ठरेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com