Cabinet Expansion : काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर बंडाचे वारे; बस रोखल्या, टायर जाळले, 19 नगरसेवकांचे राजीनामे

Congress faces statewide protests after cabinet expansion leaves several MLAs without ministerial berths : मंत्रिपद न मिळाल्याने अनेक आमदारांच्या समर्थकांचे राज्यभर आंदोलन; डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेतृत्वासमोर अंतर्गत नाराजीचे मोठे आव्हान
Cabinet Expansion
Cabinet ExpansionSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Congress : कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचे वारे अधिकच वेगाने वाहू लागले आहेत.

मंत्रिपद न मिळाल्याने अनेक आमदारांच्या समर्थकांनी राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, बस रोखणे, टायर जाळणे, धरणे आंदोलन, राजीनामे आणि घोषणाबाजी अशा प्रकारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. या घडामोडींमुळे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेतृत्वासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.

माजी मंत्री एच. के. पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने गदग येथे त्यांच्या समर्थकांनी मानवी साखळी उभारून बस रोखल्या. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D K Shivakumar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याचवेळी गदग-बेटगेरी नगरपालिकेतील काँग्रेसचे 19 नगरसेवकांनी आपल्या पदांचे राजीनामे देत पक्ष नेतृत्वावर दबाव वाढवला आहे. या घटनेनंतर काँग्रेस हायकमांड हा असंतोष कसा हाताळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

एम. कृष्णप्पा यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी बंगळुरातील केपीसीसी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. अनेक ब्लॉक काँग्रेस (Congress) अध्यक्षांनी डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवला. काही पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याची तयारीही दर्शवली.

Cabinet Expansion
Sangram Jagtap On Congress : 'गुंगी गुडिया' वादात नवा ट्विस्ट; संग्राम जगताप म्हणाले, 'सुनेत्रा पवारांचे काम दुर्गेच्या रूपात दिसेल'

विजयनगर भागात नागरभावी आणि टोलगेट चौकात समर्थकांनी आंदोलन करत मुख्यमंत्री शिवकुमार यांच्या छायाचित्रांचे दहन केले. कोलार जिल्ह्यातील बंगारपेटचे आमदार एस. एन. नारायणस्वामी यांना मंत्रिपद न मिळाल्याने समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष हरीश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Cabinet Expansion
Congress vs NCP conflict : 'हीच काँग्रेसच्या अधःपतनाची सुरुवात'; सुनेत्रा पवार प्रकरणावर अमोल मिटकरींचा हल्लाबोल

नारायणस्वामी यांनीही के. एच. मुनियप्पा यांच्याबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत, "याचे परिणाम पुढील काळात दिसतील," असा इशारा दिला. मालूरचे आमदार के. वाय. नंजेगौडा यांनीही मंत्रिमंडळातील डावलण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश यांनी समर्थकांशी चर्चा करून पुढील राजकीय भूमिका जाहीर करण्याचे संकेत दिले.

माजी मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजी आहे. त्यांच्या पुत्र व खासदार सुनील बोस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही समर्थकांकडून करण्यात आली. चित्रदुर्गमध्ये आमदार एन. वाय. गोपालकृष्ण यांच्या समर्थकांनी बस रोखून टायर जाळले. चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील बागेपल्लीचे आमदार एस. एन. सुब्बारेड्डी यांच्या समर्थकांनीही आंदोलन छेडले असून बागेपल्ली, गुडिबंडे आणि चेलूर तालुक्यांत बंदची घोषणा करण्यात आली आहे.

आणखी आमदारही नाराज

ब्याडगीचे आमदार बसवराज शिवण्णावर, तिप्तूरचे षडाक्षरी, गुब्बीचे श्रीनिवास आणि शिराचे जयचंद्र यांच्यासह अनेक आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. गुब्बीचे आमदार श्रीनिवास यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणाही केली.

रामदुर्ग अन् मुधोळमध्येही निदर्शने

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे आमदार अशोक पट्टण यांना मंत्रिपद न मिळाल्याच्या निषेधार्थ समर्थकांनी आंदोलन केले. विजापूर जिल्ह्यातील मुद्धेबिहाळ येथेही निदर्शने झाली, तर मुधोळमध्ये आमदार आर. बी. तिम्मापूर यांच्या समर्थकांनी टायर जाळून सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

पक्ष नेतृत्वापुढे मोठे आव्हान

मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील विविध भागांत काँग्रेस नेत्यांच्या समर्थकांकडून सुरू असलेल्या आंदोलनांमुळे पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे. समर्थकांचे राजीनामे, आंदोलनांचा वाढता विस्तार आणि आमदारांची उघड नाराजी यामुळे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस हायकमांड हे हे असंतोषाचे वादळ कशा प्रकारे शांत करतात, याकडे आता संपूर्ण कर्नाटकाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com