Karnataka Governor : काँग्रेस राज्यपालांना खिंडीत गाठणार; केंद्रीय मंत्र्यांसह भाजप नेत्यांवरही चालणार खटला?

Congress CM Siddaramaiah Thavarchand Gehlot : जमीन घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी नुकतीच राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिली आहे.
Karnataka Governor, Congress
Karnataka Governor, CongressSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेसने कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना खिंडीत गाठण्याची तयारी केली आहे. गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी दिली आहे. त्यावर राजकारण तापलं असून आता काँग्रेसही याच मुद्द्यावर राज्यपालांची कोंडी करणार आहे.

कथित MUDA जमीन घोटाळाप्रकरणी सिध्दरामय्या यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी राज्यपालांनी दिली आहे. त्याविरोधा मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. भाजपनेही राज्यात यावरून रान उठवले आहे. पण आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत राज्यपालांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Karnataka Governor, Congress
Jayant Patil : साहेब, प्रायश्चित अटळ आहे! जयंत पाटील असं का म्हणाले?

एनडीएतील जनता दल (एस)चे नेते व केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर खटला चालवण्यासाठी लोकायुक्तांनी राज्यपालांकडे परवानगी मागितली आहे. कथित खाण घोटाळ्यात सहभागाचे त्यांच्यावर आरोप आहेत. पण राज्यपालांकडून ही परवानगी दिली जात नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

त्याचप्रमाणे भाजपचे नेते मुरुगेश निरानी, जनार्दन रेड्डी आणि शशिकला जोल्ले यांच्यावरही विविध प्रकरणांत खटला चालवण्यासाठी परवानगी देण्याची विनंती लोकायुक्तांनी राज्यपालांकडे केली आहे. हे अपीलही अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. याच मुद्यावरून काँग्रेसने राज्यपालांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Karnataka Governor, Congress
Revanth Reddy : सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा माफीनामा; 'डील' प्रकरण आले अंगलट...

दरम्यान, कर्नाटक काँग्रेस 31 ऑगस्टला राजभवन चलो आंदोलन करणार आहे. राज्यातील सर्व मंत्री, काँग्रेसचे आमदार राजभवनवर मोर्चा काढणार आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचारावरून आरोप केले जात असताना आता एनडीएतील चार नेत्यांमुळेही भाजप अडचणीत येऊ शकते.

राज्यपाल काय भूमिका घेणार?

मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालवण्यास तातडीने परवानगी देणारे राज्यपाल थावरचंद गेहलोत काँग्रेसच्या मागणीवर काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सिध्दरामय्यांसह भाजप नेत्यांवर खटला चालवण्याची परवानगीही लोकायुक्तांनीच मागितली होती. त्यामुळे सिध्दरामय्यां एक न्याय आणि भाजप नेत्यांना दुसरा, अशी टीका काँग्रेसकडून होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com