Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Jayant Patil : साहेब, प्रायश्चित अटळ आहे! जयंत पाटील असं का म्हणाले?

Chhatrapati Shivaji Maharaj Statue PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघर येथील कार्यक्रमात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली.
Published on

Mumbai : मालवण येथील राजकोट किल्ल्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी जाहीर माफी मागितली. शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पण मोदींच्या या माफीनाम्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी निशाणा साधला आहे.

पालघरमध्ये वाढवण बंदराच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेचा उल्लेख करत माफी मागितली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रसे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकत नाही. प्रायश्चित अटळ आहे, असे पाटील यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Jayant Patil
Ambadas Danve : पुतळा कोसळल्यानंतर माफीनामा पण अंबादास दानवेंचे 'हे' चार प्रश्न उडवणार CM शिंदेंची झोप

भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो, असेही पाटील म्हणाले आहे. मोदींनी उशिरा माफी मागितली. या माफीने काहीही होणार नाही, अशी टीका शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

मुंबईतील काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही मोदींच्या माफीनाम्यावर पलटवार केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज पुन्हा दिल्लीला महाराजांपुढे, महाराष्ट्रापुढे, महाराष्ट्रवासियांच्या अस्मितेपुढे झुकावंच लागलं. प्रधानमंत्री महोदयांना महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागावीच लागली.

Jayant Patil
Balasaheb Thorat : अजब-गजब कारभार, शिवद्रोही मोकाट आणि शिवप्रेमी स्थानबद्ध

फक्त माफीने भागणार नाही. मोदीजी, तुमच्या सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि निष्काळजीपणामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान जमीनदोस्त झाला आहे. तुमचे सरकार आमच्या महापुरुषांचा कायमच अपमान करत आले आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी ED-CBI-IT या यंत्रणांचा सर्रास वापर विरोधकांना संपवण्यासाठी करत आले आहे. आता या महा भ्रष्टाचाराप्रकरणी तुम्ही नक्की काय कारवाई करणार आहात, असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.

फक्त कंत्राटदारावर कारवाई करून चालणार नाही, महाराजांचा अपमान करण्याऱ्या तसेच महाराष्ट्रवासियांच्या स्वाभिमानाच्या चिंधड्या उडवणाऱ्या सर्व गद्दारांना कठोर शासन झाले पाहिजे, ही महाराष्ट्राची मागणी असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com