Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराआधीच काँग्रेसला धक्का: मंत्रिपद न मिळाल्याने बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; कर्नाटकमध्ये खळबळ

Karnataka Congress Crisis : मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्यासमोर संकंट उभे झाले आहे.
Congress Crisis
Congress Crisissarkarnama
Published on
Updated on

Congress government Karnataka Politics : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे कर्नाटकमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, काँग्रेसच्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या इंडी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, नाराज आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी उद्या (ता. ४) राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी मंत्रिपद न मिळाल्याने काही आमदारांच्या समर्थकांनी काँग्रेस हायकमांडच्या विरोधात घोषणाबाजी करून आक्रोश व्यक्त केल्याचेही आता समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे नव्या मंत्रिमंडळात तब्बल २० आमदारांना संधी मिळणार असून विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषदेच्या सभापतीही बदलले जाणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जी. एस. पाटील, तर उपाध्यक्ष ए. एस. पोनन्ना यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना २० आमदारांची यादी पाठविण्यात आली आहे.

काँग्रेसच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासमोर संकट उभे केले आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यशवंतरायगौडा पाटील यांनी हंगामी विधानसभा अध्यक्ष रुद्राप्पा लमाणी यांच्याकडे राजीनामा सादर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेले. हंगामी अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा विधानसभा सचिवांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच काँग्रेसमधील नाराजीनाट्य उघड झाले आहे.

Congress Crisis
Congress Crisis : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर : बड्या नेत्यावर अल्पसंख्यक सेल अध्यक्षासह महिला नेत्याचे गंभीर आरोप

मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने संतप्त झालेल्या पाटील यांच्या समर्थकांनी आमदार भवन परिसरात जोरदार निदर्शने केली. समर्थकांनी यशवंतरायगौडा पाटील यांचे छायाचित्र हातात घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नव्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ सोमवारी सायंकाळी पाच वाजता बंगळूर येथील लोकभवन येथे आयोजित करण्यात आला. मात्र, यशवंतरायगौडा पाटील यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आमदार गोपालकृष्ण राजीनाम्याच्या तयारीत

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी उद्या (ता. ४) सकाळी १० वाजता राजीनामा देणार असल्याचे सांगत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, केवळ वशिलेबाजी असलेल्या आणि प्रभावशाली लोकांनाच मंत्रिपदे मिळतात का? मंत्रिपद मिळण्याची आशा असूनही शेवटच्या क्षणी आपले नाव वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, डॉ. मंकाळ वैद्य यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रियकृष्ण समर्थकांचा आक्रोश

गोविंदराजनगरचे आमदार प्रियकृष्ण यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने संतप्त झालेल्या एम. कृष्णाप्पा यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी राजधानी बंगळूरमध्ये मोठे आंदोलन केले. मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिवकुमार हे बंगळूरमधील नगरभावी येथील ‘अज्जयन शाखा’ मठात पोहोचले होते. यावेळी रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

Congress Crisis
Congress crisis : काँग्रेसमध्ये 5 वर्षांपूर्वी जे घडलं, आज त्याचीच पुनरावृत्ती; एका नेत्यामुळे होणार पक्षाचा घात?

परिस्थिती गंभीर झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या गाडीने यू-टर्न घेतला आणि ती परत गेली; मात्र, कार्यकर्त्यांनी गाडीचा पाठलाग करत आपला संताप व्यक्त केला. नगरभावी सर्कल आणि विजयनगर मुख्य रस्त्यावर जमलेल्या कृष्णाप्पा समर्थकांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध बसून व झोपून वाहतूक पूर्णपणे रोखून धरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com