Siddaramaiah Shivakumar clash : शिवकुमार कार्यक्रम सोडून गेले, सिध्दरामय्या संतापले अन्..; नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर आल्याने खळबळ

Congress Karnataka crisis : सिध्दरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळाबाबत सहमती झाली, असेही तर्कवितर्क लढवले जात होते.
Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash publicly over chief ministerial ambitions.
Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash publicly over chief ministerial ambitions. Sarkarnama
Published on
Updated on

Congress leadership fight : मागील काही दिवसांपासून कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यांच्या समर्थक आमदारांकडून केली जात आहे. तर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण या पदावर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, शनिवारी एका कार्यक्रमात घडलेल्या प्रकाराने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

मंगलोर येथे एका शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. याच कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमधील सुप्त वाद समोर आला. शिवकुमार हे आपले भाषण संपवून कार्यक्रम अर्धवट सोडून तिथून निघून गेले. बेंगलुरू येथे तातडीचे काम असल्याचे कारण त्यांनी सांगितले. तोपर्यंत सर्वकाही आलबेल असल्याचे उपस्थितांना वाटत होते.

कार्यक्रमादरम्यान एका काँग्रेस नेत्याने सिध्दरामय्या यांना डीके शिवकुमार यांचे नाव भाषणादरम्यान घेण्याची विनंती केली. त्याचे उत्तर देताना सिध्दरामय्या चांगलेच संतापले होते. डी. के. शिवकुमार इथे नाहीत. ते बेंगलुरूला गेले आहेत. आपण केवळ उपस्थित लोकांचेच स्वागत करू शकतो, घरी बसलेल्या लोकांचे नाही, असे सिध्दरामय्या म्हणाले.

Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash publicly over chief ministerial ambitions.
Women Parliamentarians : महिला खासदारांचा लैंगिक, मानसिक छळ; धक्कादायक अहवाल समोर

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून दोन्ही नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. शिवकुमार हे कार्यक्रमात उपस्थित होते. भाषण झाल्यानंतरच ते निघून गेले. हे सिध्दरामय्या यांनाही माहिती होते. त्यानंतर सिध्दरामय्या यांनी असे विधान केल्याने दोन्ही नेत्यांमधील दुराव्याबाबत संभ्रम वाढला आहे. त्यामुळे नेतृत्व बदलाच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.

Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash publicly over chief ministerial ambitions.
INDIA Alliance: मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा; 'इंडिया' आघाडी पुन्हा 'अ‍ॅक्शन मोड'वर; अधिवेशनासाठीची रणनीती ठरली?

या घटनेवरून काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. राज्यातील घडामोडी पक्ष आणि सरकारसाठी योग्य नसल्याची चर्चा सुरू आहे. भाजपकडूनही दोन्ही नेत्यांमध्ये खुर्चीसाठी वाद सुरू असल्याचे म्हटले आहे. राज्यात काँग्रेसला सत्ता मिळाल्यानंतर शिवकुमार हेच मुख्यमंत्रिपदाची प्रमुख दावेदार होते. मात्र, काँग्रेस हायकमांडकडून सिध्दरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, अशी चर्चा त्यावेळी होते. त्याचप्रमाणे दोन्ही नेत्यांमध्ये अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळाबाबत सहमती झाली, असेही तर्कवितर्क लढवले जात होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com