Karnataka Election Result : राष्ट्रीय दर्जा मिळविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न; मिळाली इतकी मते...

NCP in Karnataka : राष्ट्रवादी काँग्रेसचा नऊ जागांवर लढा; तीन जागांवर चांगली मते
Karnataka, NCP
Karnataka, NCPSarkaranama
Published on
Updated on

Karnataka Vidhan Sabha Election Results 2023: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा निकष पूर्ण करू शकत नसल्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकच्या निवडणुकीत उतरली. त्यानंतर गमावलेल्या राष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करीत असल्याची चर्चाही झाली.

आता कर्नाटक निवडणुकीच्या चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तर अपेक्षीत मतेही मिळविता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी काही ठिकाणी राष्ट्रवादीने दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत.

Karnataka, NCP
Karnataka Election Result 2023 : ना शरद पवार ना राज ठाकरे; सीमाभागात कुणाचाच करिश्मा नाही, महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा

कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) बेळगाव, विजापूर, विजयनगर, कोप्पल, कोडोगो, मैसूर या जिल्ह्यांत उमेदवार दिले होते. त्यातील सीमावर्ती भागातून पक्षाला पाठिंबा मिळेल, अशी आशा होती. मात्र तीही फोल ठरल्याचे निकालाअंती दिसून आली.

राष्ट्रवादी काँग्रेसने निपाणी (बेळगाव)तून उत्तमराव पाटील (Uttamrao Patil), देवर हिप्पारगी (विजापूर) येथून मन्सूर साहेब बिलाही, बसवन बागेवाडी (विजापूर) जमीर अहमद इनामदार, नागथन (विजापूर)मधून कुलप्पा चव्हाण, येलबर्गा (कोप्पल) येथून हरी आर, रानबेन्नूर (हवेरी)मध्ये आर. शंकर, हाग्री बोम्मनहल्ली (विजयनगर) मधून सुगुना के, विराजपेट (कोडोगो) येथे एस. वाय. एम. मसूद फौजदार आणि नरसिंहराज (मैसूर) येथे रेहाना बानो यांना उमेदवारी दिली होती.

Karnataka, NCP
D.K. Shivakumar : बारामतीपेक्षाही मजबूत डी.के. शिवकुमारांचा गड; आठव्यांदा आमदार, फक्त शेवटच्या दिवशीच करतात प्रचार

कर्नाटकमध्ये (Karnataka) राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त ०.२७ टक्के मते मिळाली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे निपाणीतील उत्तमराव पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची ६५ हजार ६१४ मते मिळविली आहेत. रानबेन्नूरमधील आर. शंकर यांना ३७ हजार ५५९ मते मिळाली आहेत. ते तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. देवर हिप्परगीमध्ये सुनागर शंकराप्पा तिप्पण्णा यांना ३३ हजार ३७३ मते मिळाली आहेत. येथे राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावर आहे.

Karnataka, NCP
Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; राहुल गांधींचं अभिनंदन करत ठाकरे म्हणाले, ही 2024 च्या विजयाची नांदी

दरम्यान, राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या आम आदमी पक्षाने (AAP) कर्नाटकातील २०९ विधानसभा जागांसाठी आपले उमेदवार उभे केले. कर्नाटकमध्ये काँग्रेस-भाजप-जेडीएस अशी तिरंगी लढत होईल अशी शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली होती. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसने बाजी मारली आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जेडीएस तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र आम आदमी पक्ष खाते उघडण्यात अपयशी ठरला आहे. कर्नाटकच्या जनतेने 'आप'ला पूर्णपणे नाकारले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com