धक्कादायक : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या

येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांच्या नातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Yediyurappa with granddaughter Soundarya
Yediyurappa with granddaughter Soundarya Sarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : भाजप (BJP) नेते व कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांच्या नातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिचे नाव सौंदर्या नीरज असे असून, ती राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी येडियुरप्पांच्या सांत्वनासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. (Yediyurappa granddaughter commits suicide)

सौंदर्या ही येडियुरप्पांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीची मुलगी होती. ती 30 वर्षांची होती. ती बंगळूरमधील एम.एस.रामय्या रुग्णालयात डॉक्टर होती. ती पतीसमवेत माऊंट कॅरमेल कॉलेजजवळील इमारतीत राहत होती. तिचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि तिला सहा महिन्यांचे अपत्यही आहे. आज सकाळी राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बाऊरींग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Yediyurappa with granddaughter Soundarya
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर नितेश राणे 24 तासांतच शरण

दरम्यान, येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांनी चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. गेल्या वर्षी त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

Yediyurappa with granddaughter Soundarya
भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होताच भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया

कर्नाटक विधानसभेने उत्कृष्ट आमदार पुरस्कार मागील वर्षीपासून सुरू केला आहे. या पुरस्काराचा पहिला मान येडियुरप्पांना मिळाला होता. राजकारणातील त्यांची प्रदीर्घ कारकिर्द आणि सभागृहातील उत्कृष्ट कामगिरी या आधारावर हा पुरस्कार देण्यात आला होता. येडियुरप्पांनी गेल्या वर्षी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ते 1983 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. ते लोकसभेवरही निवडून गेले होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे केवळ आमदार म्हणून काम करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com