नाईट कर्फ्यू मागे घेण्याचा निर्णय; हॉटेल, रेस्टॉरंटवरील निर्बंध हटवले!

कर्नाटक राज्यातील सर्वच शाळा पुन्हा सुरू होणार आहेत
karnataka night curfew
karnataka night curfew sarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : कोविड-19 (covid)ची तिसरी लाट कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक (Karnataka) सरकारने शनिवारी (ता. २९ जानेवारी) नाईट कर्फ्यू (night curfew) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे बंगळूरसह कोविडचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणावरून बंद ठेवण्यात आलेल्या सर्व शाळांचे वर्ग नियमितपणे सुरू करण्यात येणार आहेत. बहुतांश कोविड प्रतिबंध हटविण्याचे सरकारने ठरविले आहे. (Karnataka government has decided to withdraw the night curfew)

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तज्ज्ञांच्या बैठकीनंतर महसूल मंत्री आर अशोक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, आमच्याकडे जनतेसाठी चांगली बातमी आहे. येत्या ३१ जानेवारीपासून रात्रीचा कर्फ्यू असणार नाही. पब, रेस्टॉरंट्स, हॉटेल्सवरील 50 टक्के आसन मर्यादा काढून टाकण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. ते आता 100 टक्के क्षमतेने खुले आहेत. निर्बंध हटविण्याची हॉटेल मालकांची मागणी होती. त्यांनी सरकारकडे त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दिलासा मागितला होता.

karnataka night curfew
अजित पवारांचे धक्कातंत्र : काकडे, जगतापांच्या कार्यकर्त्यांना दिली प्रथम संधी!

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले की, बंगळूर शहर जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून इयत्ता पहिली ते ९ वी पर्यंतचे शारीरिक वर्ग सुरू करू शकतात. तिसऱ्या लाटेमुळे पहिली ते नववीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग बंद करण्याात आले होते. सोमवारपासून, सर्व वर्ग कोविड नियमांचे पालन करून सुरू होतील, असे ते म्हणाले.

karnataka night curfew
परदेशातील त्या बैठकीचा पर्दाफाश होण्याच्या भीतीने राऊत झिंगाट झालेत : पडळकर

बंगळूरमधील मानक कार्यप्रणाली इतर जिल्ह्यांप्रमाणेच असेल. कोणतीही पॉझिटिव्ह केस आढळल्यास केवळ तोच वर्ग बंद केला जाईल, संपूर्ण शाळा नाही. त्या वर्गातील सर्व मुलांची चाचणी घेतली जाईल. एकूण पॉझिटिव्ह प्रकरणांच्या संख्येवर अवलंबून जिल्हाधिकारी शाळा किती दिवस बंद ठेवायची, याचा निर्णय घेतील. पॉझिटिव्ह प्रकरणांच्या संख्येनुसार शाळा तीन किंवा पाच दिवस बंद ठेवता येईल, असे नागेश यांनी स्पष्ट केले.

karnataka night curfew
मोदी, शहा, नड्डा, गडकरी उत्तराखंडमध्ये स्टार प्रचारक ; 30 जणांची यादी जाहीर

बंगळूरमधील पदवी महाविद्यालयेही सुरू होतील. तज्ज्ञांनी सरकारसमोर मांडलेला डेटा आणि ट्रेंडवर आधारित निर्णय घेतले आहेत. सर्व वयोगटातील एकूण प्रकरणांची संख्या 4.02 लाख आहे, त्यापैकी 0-14 वयोगटातील मुलांची प्रकरणे 22 हजार 318 आहेत. ते एकूण प्रकरणांच्या 5.5 टक्के आहे. एकूण रूग्णालयात रुग्णांची संख्या 6 हजार 732 आहे, जी 1.6 टक्के आहे. त्यापैकी, रुग्णालयात 401 (1.8 टक्के) मुले आहेत. एकूण मृत्यू 146 आहेत, जे प्रमाण 0.03 टक्के आहे. पॉझिटिव्हीटी दर 33 टक्कांवरून 20.9 टक्क्यांवर घसरला आहे, असे अशोक म्हणाले.

karnataka night curfew
टीईटी परीक्षा घोटाळा मंत्रालयापर्यंत : सुपेचा गाॅडफादर IAS अधिकारी अटकेत

लग्नाच्या उपस्थितींच्या संख्येत वाढ

चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्समध्ये 50 टक्के क्षमतेचा नियम सुरू राहील, जेथे लोक बंदिस्त जागेत तासन् तास एकत्र बसतात. त्याचप्रमाणे, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुल आणि स्टेडियमसाठी 50 टक्के नियम कायम ठेवण्यात आला आहे. सरकारने लग्नासारख्या समारंभात पाहुण्यांच्या संख्येची मर्यादा आणखी वाढवली आहे. लग्नासाठी, खुल्या जागेत पाहुण्यांची मर्यादा 200 वरून 300 आणि बंद जागेत 100 वरून 200 पर्यंत वाढवत आहोत, असेही मंत्री अशोक यांनी नमूद केले. धार्मिक उपासनेच्या ठिकाणी एका वेळी फक्त 50 लोकांना आत प्रवेश देण्याचा विद्यमान नियम चालू राहील. आम्ही सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देत ​​आहोत, असे अशोक म्हणाले. सर्व जत्रा, रॅली, धरणे, निषेध, सामाजिक/धार्मिक मेळावे निषिद्ध राहतील. ज्या सरकारी कार्यालयांना 50 टक्के उपस्थितींचा नियम लागू केला होता, त्यांना आता पूर्ण क्षमतेने काम करता येणार आहे, असेही अशोक यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com