
Impact on Karnataka’s Congress Government : 'वोट चोरी'विरोधात आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या 300 खासदारांचा मोर्चा सुरू असतानाच कर्नाटकात राजकीय भूंकप झाला आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील सहकार मंत्र्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे वोट चोरीशी संबंधित कारणावरूनच त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
कर्नाटकचे सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदांची चोरी झाल्याचे विधान राजण्णा यांनी केले होते. हेच विधान त्यांना भोवले. राजण्णा यांचे विधानाची जोरदार चर्चा होऊ लागल्यानंतर हायकमांडकडून मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना त्यांचा राजीनामा घेण्याचा आदेश आल्याची चर्चा आता रंगली आहे.
राजण्णा यांचे आमदार पुत्र राजेंद्र यांनी मुख्यमंत्र्यांकडे वडिलांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपविल्याचे समजते. याबाबत अद्याप मुख्यमंत्री किंवा राजण्णा यांच्याकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भाजपकडून विधिमंडळात राजीनाम्याच्या वृत्तावर अधिकृतपणे खुलासा करण्याची मागणी केल्यानंतर राजण्णा यांनी मुख्यमंत्री याबाबत भाष्य करतील, असे सांगितले होते.
राजण्णा हे सिध्दरामय्या यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. मात्र, त्यांनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून थेट आपल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने वाद निर्माण झाला आहे. मतदारयाद्यांमधील घोळ, त्याबाबतची पक्षाच्या भूमिकेबाबत राजण्णा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे एकप्रकारे देशभरात वोच चोरीविरोधात आवाज उठविणाऱ्या राहुल गांधींच्या भूमिकेलाच छेद देणारे हे विधान होते.
राहुल गांधी यांनी 8 ऑगस्ट रोजीच कर्नाटकात एका रॅलीच्या माध्यमातून वोट चोरीविरोधात आवाज उठवला होता. त्याआधी त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर लगेचच राजण्णा यांचे विधान आल्याने भाजपच्या हाती आयते कोलित मिळाले होते. ही बाब पक्षश्रेष्ठींना चांगली खटकली होती.
राजण्णा यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधान केले होते. राज्यात आणखी उपमुख्यमंत्री असावेत, असे सांगत त्यांनी डी. के. शिवकुमार यांचे महत्व कमी करण्याबाबत सूचक विधान केले होते. शिवकुमार यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांना काही दिवसांपूर्वीच हसन जिल्ह्याच्या मिनिस्टर इन्चार्ज पदावरून हटविले होते. दरम्यान, राजण्णा यांच्याआधी सरकारमधील मंत्री बी. नागेंद्र यांना भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राजीनामा द्याला लागला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.